घरदेश-विदेशरेल्वेची भन्नाट कारवाई; दलालांना पळता भुई थोडी!

रेल्वेची भन्नाट कारवाई; दलालांना पळता भुई थोडी!

Subscribe

रेल्वे प्रशासनाने गेल्या महिन्याभरात केलेल्या कारवाईमध्ये सुमारे ९०० दलालांना अटक केली आहे. तसेच, ५ कोटींहून अधिक किंमतीची तिकिटेही ताब्यात घेण्यात आली आहेत.

रेल्वे तिकिटांचा गैरव्यवहार आणि दलाली हा रेल्वे प्रशासनासमोरचा कित्येक वर्षांचा जुना प्रश्न. अनेकदा प्रयत्न करूनही तिकिटांच्या दलालीला आळा घालणं शक्य झालेलं नाही. मात्र, आता रेल्वे प्रशासनानं या दलालांच्या मुसक्या आवळण्यासाठी भन्नाट कारवाई सुरू केली आहे. रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) देशभरातल्या तब्बल १०० शहरांमध्ये ‘ऑपरेशन स्टॉर्म’ नावाने या दलालांविरोधात मोहीम उघडली आहे. पहिल्याच दणक्यात आरपीएफच्या हाती मोठं यश लागलं असून या कारवाईत जवळपास ९०० दलालांना अटक करण्यात यश आलं आहे. त्याशिवास सुमारे ५ कोटींहून अधिक किंमतीची तिकिटेही आरपीएफने जप्त केली आहेत.

८ ऑक्टोबरपासून सुरू झालं ऑपरेशन!

गेल्या सुमारे महिन्याभरापासून आरपीएफने ही कारवाई केली आहे. ७ ऑक्टोबरला सुरू झालेल्या ‘ऑपरेशन स्टॉर्म’मध्ये पश्चिम रेल्वे आणि पूर्व रेल्वेने केलेल्या या कारवाईमध्ये एकूण ८९१ दलालांना अटक केली आहे. फक्त शनिवारीच पश्चिम रेल्वेच्या हद्दीत ४० तर पूर्व रेल्वेच्या हद्दीतल्या ३२ दलालांवर कारवाई करण्यात आली. तसेच ३६ लाख रुपये किंमतीची १८७५ तिकिटं जप्त करण्यात आरपीएफच्या पथकाला यश आलं.

- Advertisement -

तुम्ही हे वाचलंत का? – रेल्वेनं विनातिकीट प्रवास पडणार महागात


अवैध सॉफ्टवेअरचा वापर

दरम्यान, रेल्वेने मुंबईत विशेष कारवाई करत तिकिट बुकिंगचे एक सॉफ्टवेअरही जप्त केले आहे. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून अवैधपणे इ तिकिटे काढली जात होती. यासाठी तब्बल १२६८ बनावट आयडींचा वापर केला जात होता अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -