…म्हणून देशातलं सर्वात मोठं Covid Care Centre बंद करण्यात येणार

देशातील सर्वात मोठं कोविड केअर सेंटर असून आता मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

...म्हणून देशातलं सर्वात मोठं Covid Care Center बंद करण्यात येणार

जगभरासह देशात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. देश कोरोना महामारीशी लढत असताना रोज ८० हजारांहून अधिक रुग्णांची नोंद करण्यात येत आहे. मात्र बाधितांचा आकडा वाढत असताना अशा परिस्थितीत कर्नाटकातील सर्वात मोठं कोविड सेंटर बंद करण्यात येणार आहे. हे सेंटर १५ सप्टेंबर रोजी बंद करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

कर्नाटकातील बंगळुरू येथे असणारं भारतातील सर्वात मोठं केअर सेंटर असून ते बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या सेंटरमध्ये १० हजार बेडची व्यवस्था करण्यात आली असून असाही दावाही करण्यात आला होता की, देशातील सर्वात मोठं कोविड केअर सेंटर आहे. आता मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे.

म्हणून घेतला राज्य सरकारने निर्णय

होम क्वारंटाइनची सुविधा देण्यात आली नव्हती तेव्हा या केंद्रावर रुग्णांना मोठ्या संख्येने भर्ती केलं जात होते.या सेंटरमध्ये १० हजार बेडची व्यवस्था करण्यात आली असून बैठकीत ठरविलेल्या कोविड सेंटरच्या अंथरुण, पंखे, पाणीचं मशीन आदी सामानांना सरकारी वसतिगृह आणि रुग्णालयांना देण्यात येणार आहे. कोरोनाची लक्षण सौम्य आणि लक्षणं नसणाऱ्या रुग्णांना होम क्वारंटाइनचा सल्ला दिला जातो. त्यामुळे आता या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल होणाऱ्यांची संख्या खूप झाल्याने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे.


कोविडमध्येही दीड महिन्यात ठाण्यात १५२ कोटींची मालमत्ता कर वसुली