घरदेश-विदेशकोणत्या पक्षाकडे किती पैसे ?

कोणत्या पक्षाकडे किती पैसे ?

Subscribe

निवडणूक आयोगाच्या रिपोर्टमध्ये माहिती समोर

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यानंतर विविध पक्षांच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रांमुळे उमेदवारांकडे किती संपत्ती आहे, याची माहिती सर्वांना मिळाली. परंतु कोणत्या पक्षाकडे किती संपत्ती आहे, याबाबतची माहितीदेखील समोर आली आहे. निवडणूक आयोगाने याबाबत एक रिपोर्ट जारी केला आहे. निवडणूक आयोगाच्या रिपोर्टनुसार देशातील कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा बहुजन समाज पक्षाकडे (बसपा) सर्वाधिक बँक बॅलन्स आहे.

मायावतींच्या बसपाकडे वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये मिळून तब्बल 670 कोटी रुपये बँक बॅलन्स आहे. या यादीत दुसर्‍या क्रमांकावर अखिलेश यादव यांची समाजवादी पक्षाकडे (सपा) आहे. सपाकडे तब्बल 471 कोटी रुपयांचा बँक बॅलन्स आहे. निवडणूक आयोगाच्या रिपोर्टमध्ये लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे, देशातील सर्वात मोठे पक्ष असलेले भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष संपत्तीच्या बाबतीत बसपा आणि सपाच्या आसपासही नाहीत. निवडणूक आयोगाच्या रिपोर्टनुसार काँग्रेस पक्ष तिसर्‍या क्रमांकावर आहे. काँग्रेसकडे 196 कोटी रुपयांचा बँक बॅलन्स आहे. तर चंद्राबाबू नायडू यांचा पक्ष तेलुगु देसम पार्टी (टीडीपी)चौथ्या क्रमांकावर आहे. टीडीपीकडे 107 कोटी रुपये इतका बँक बॅलन्स आहे. या यादीत भारतीय जनता पक्ष (भाजप) पाचव्या क्रमांकावर आहे.

- Advertisement -

भाजपकडे 82 कोटी रुपयांचा बँक बॅलन्स आहे. 2017-18 मध्ये भाजपला तब्बल 1 हजार 27 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या होत्या परंतु, गेल्या वर्षभरात भाजपने जाहिरातींसह पक्षाच्या इतर कामकाजासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केल्यामुळे पक्षाकडे 1027 कोटी रुपयांपैकी केवळ 82 कोटी रुपये शिल्लक आहेत. माकप (मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष)आणि आप (आम आदमी पार्टी ) या यादीत पिछाडीवर आहेत. या दोन्ही पक्षांकडे प्रत्येकी 3 कोटी रुपयांचा बँक बॅलन्स आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -