घरCORONA UPDATEहिवाळ्यात काय येणार? कोरोनाची लस की दुसरी लाट? जाणून घ्या तज्ज्ञांची मते

हिवाळ्यात काय येणार? कोरोनाची लस की दुसरी लाट? जाणून घ्या तज्ज्ञांची मते

Subscribe

आतापर्यंत चीनमधून पसरलेल्या कोरोना विषाणू २१३ देशांमध्ये पसरला आहे. सुमारे २ कोटी २० लाख लोकांना या प्राणघातक विषाणूची लागण झाली आहे. तर ८ लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. लस विकसकांसाठी चांगली गोष्ट म्हणजे विषाणू आता वेगाने रुप बदलत नाही आहे. तथापि, अद्याप संसर्गाची गती कमी झालेली नाही. दरम्यान, यावर्षी हिवाळ्यापर्यंत कोविड-१९ ची लस येईल, असा दावा अनेक तज्ञ करीत आहेत. त्याचबरोबर काही तज्ञ असेही म्हणत आहेत की कोरोना हिवाळ्याच्या हंगामातच सर्वात विनाशकारी ठरणार आहे. हिवाळ्यात येणारी कोरोनाची दुसरी लाट पहिल्यापेक्षा अधिक धोकादायक असू शकते, असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे.

WHO सोबत काम केलेले संसर्गजन्य रोग तज्ज्ञ क्लाऊस स्टॉहर यांनी ‘द प्रिंट’ मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालात असे म्हटले आहे की कोरोना विषाणूची साथीची वागणूक इतर श्वसन रोगांपेक्षा फारशी वेगळी नाही. हिवाळ्यात कोरोना विषाणू परत येऊ शकतो, असा दावा त्यांनी केला आहे. कोरोनाच्या आणखी एका लाटेचा सामना करण्यासाठी जग चांगल्या तयारीत असणे आवश्यक आहे. कोरोनाची संभाव्य लाट सध्याच्या साथीच्या आजारापेक्षा अधिक तीव्र असू शकते. ब्रिटनच्या ‘वैद्यकीय विज्ञान अकादमी’ चेही असेच मत आहे. २०२१ च्या जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात २०२० च्या सुरूवातीला पहिल्या लहरीमध्ये जी परिस्थिती होती त्याप्रमाणेच परिस्थिती असेल, असे वैद्यकीय विज्ञान अकादमीच्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

ब्रिटनचे मुख्य वैद्यकीय अधिकारी, ख्रिस व्हिट्टी, सध्या कोरोना संपवण्यासाठी लसीवर काम करत असलेल्या अव्वल शास्त्रज्ञांपैकी एक आहेत. ‘न्यू स्काय’ ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की आम्ही कोणत्याही लसीवर विश्वास ठेवू शकत नाही. विशेषतः येत्या हिवाळ्यापर्यंत लस विकसित केली जाईल, अशा दाव्यांवर अजिबात नाही. पुढील हिवाळ्यापर्यंत आपण तयार असले पाहिजे. यावर्षी हिवाळ्यापर्यंत लस मिळेल, असा विचार करणे मूर्खपणाचे आहे, असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, माझा अंदाज चुकीचा असू शकतो. जगभरातील बरेच शास्त्रज्ञ लस तयार करण्याच्या कामात गुंतले आहेत, जेणेकरून प्राणघातक विषाणूचा उपचार लवकरात लवकर मिळू शकेल. आपण याची तपासणी करून लस सुरक्षित आहे की नाही याची खात्री करुन घ्यावी. ही प्रक्रिया पूर्ण होण्यास वेळ लागतो.

हिवाळ्यापर्यंत लस मिळणार नाही असा विचार करुन लोकांनी योजना आखल्या पाहिजेत, असा सल्ला त्यांनी दिला आहे. जर या काळात आम्ही एक चांगला डोस तयार करण्यात विजयी झालो तर आपण मजबूत स्थितीत असू. यानंतर, त्याची सुरक्षितता आणि प्रभावीपणाचे परीक्षण केले पाहिजे. परंतु असे होईपर्यंत आपल्याला सध्याच्या आव्हानांनुसार आपली रणनीती ठरवावी लागेल.

- Advertisement -

हेही वाचा – मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ५४१ कोटी जमा, खर्च केले फक्त १३२ कोटी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -