घरदेश-विदेशव्हॉट्सअॅपमुळे गमावली असती किडनी; थोडक्यात बचावला

व्हॉट्सअॅपमुळे गमावली असती किडनी; थोडक्यात बचावला

Subscribe

संबंधित व्यक्तीने १.६ कोटी रुपयांना स्वतःची किडनी विकण्याचा प्रयत्न केला. मात्र, याप्रकरणी त्यांची खूप मोठी फसवणूक होता होता टळली.

भारतात व्हॉट्सअॅपचा व्यापक प्रमाणात वापर करण्यात येतो. त्यामुळे आता फ्रॉड किंवा स्कॅम करणाऱ्यांनीसुद्धा लोकांची फसवणूक करण्यासाठी व्हॉट्सअॅपचा वापर करत असल्याचे दिसून येत आहे. अनेकदा लोक बोलताना ‘किडनी विकून महागड्या वस्तू विकत घेऊ’ किंवा वाईट परिस्थिती ओढावल्यास ‘किडनी विकून पैसे उभे करु’ अशाप्रकराची वक्तव्यं अगदी सहजपणे करतात. मात्र, बंगळुरुच्या एम. बी. सोमशेकर यांनी थेट व्हॉट्सअॅपवरुन आपली किडनी विकण्याचा प्रयत्न केला. व्यवसायाने स्टेनोग्राफर असलेल्या सोमशेकर यांना पैशाची नितांत गरज असल्यामुळे त्यांनी १.६ कोटी रुपयांना स्वतःची किडनी विकण्याचा प्रयत्न केला. मात्र, याप्रकरणी त्यांची खूप मोठी फसवणूक होता होता टळली. सोमकेश्वर यांनी एका वेबसाइटवर किडनी हवी आहे, अशा मजकूराची जाहिरात पाहिली होती. कोलंबीयाच्या एशिया रूग्णालयातील ट्रान्सप्लांट सर्जरी विभागाचे प्रमुख डॉक्टर अरुण वेस्ले डेव्हिड यांच्या नावाने ही जाहिरात देण्यात आली होती. ही जाहिरात पाहिल्यानंतर सोमकेश्वर यांनी रूग्णालयाच्या प्रत्यारोपण समन्वयक अपरिजिता ढाल यांच्याशी संपर्क साधला आणि आपली किडनी विकायाची असल्याचं सांगितलं.


पाहा फिचर्स: ‘फोल्ड’ होणारा भन्नाट स्मार्टफोन

दरम्यान, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, ‘सोमशेकर यांनी त्यांच्यातलं आणि डॉक्टरांमधलं व्हॉट्सअॅप चॅट ढेले यांना दाखवलं होतं. मात्र, सोमकेश्वर यांच्याशी चॅट करणारी व्यक्ती कोणीतरी भलतीच होती ज्याने डॉ. डेव्हिड यांच्या नावाचा वापर केला होता. डेव्हिड म्हणून खोटी ओळख सांगणाऱ्या त्या माणसाने सोमकेश्वर यांना हॉस्पिटलमध्ये येऊन आधार कार्ड आणि इतर ओळखपत्र सादर करण्यास सांगितलं. मात्र, प्रत्यक्षात तिथे पोहोचल्यावर सोमकेश्वर यांना जबर धक्का बसला. डॉ. डेव्हिड यांनी तो नंबर आपला नसून किडनीविषयी आपण कोणतीच जाहिरीत दिली नसल्याचे सांगितले. त्यानंतर केलेल्या तपासात डॉ. डेव्हिड यांचं नाव वापरुन कुणीतरी सोमकेश्वर यांना फसवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. दरम्यान सायबर पोलिसांनी या अज्ञात आरोपींविरुद्ध आयटी कायद्याच्या कलम ६६ सी आणि ६६ डीअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -