घरटेक-वेकव्हॉट्सअॅप लवकरच सुरु करणार पेमेंट बँक?

व्हॉट्सअॅप लवकरच सुरु करणार पेमेंट बँक?

Subscribe

व्हॉट्सअॅप लवकरच सुरु करणार पेमेंट बँक

जगभरातील लोकांच्या सर्वाधिक पसंतीचे सोशल मीडिया अॅप म्हणजे व्हॉट्सअॅप. हे व्हॉट्सअॅप लोकांना अधिक सुविधा देण्यासाठी आणि युजर फ्रेंडली होण्यासाठी नेहमी नवनवे अपडेट्स घेऊन येतं. आता या व्हॉट्सअॅप कंपनीला पेमेंट बँक सुरु करायचे आहे. गुगल तसेच इतर सोशल मीडियाकडून पेमेंट बँक सुरु केल्यानंतर आता देशातील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या व्हॉट्सअॅप कंपनीला पेमेंट बँक सुरु करण्याचा विचार आहे. त्यासाठी देशातील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून परवानगी मागितली आहे. मात्र आरबीआयने अद्याप याला परवानगी दिलेली नाही. त्यामुळे आता व्हॉट्सअॅप कंपनीला पेमेंट बँक केव्हा सुरु होणार याकडे युजर्सचे लक्ष लागले आहे.

गुगलने मारली बाजी

गेल्या दोन वर्षांपासून व्हॉट्सअॅप पेमेंट बँक सुरु करण्याबाबत सरकारबरोबर चर्चा करत आहे. या दरम्यान मात्र गुगलने बाजी मारली आहे. गुगलने ‘गुगल पे’ (Google Pay) सुरु केले आहे. आता मोठ्या संख्येने युजर्स ‘गुगल पे’ चा वापर करतात. त्यामुळे आता व्हॉट्सअॅपचे प्रमुख क्रिस डॅनिअल यांनी आरबीआयने पेमेंट बँक सुरु करण्यासाठी पत्र लिहून परनावगी मागितली आहे. मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने परवानगी दिली नाही.

- Advertisement -

वाचा – व्हॉट्सअॅप बिझनेसचे ४ महिन्यांत ३० लाख युजर्स, ६ देशांमध्ये प्रसार


हे आहे व्हॉट्अॅपचे म्हणणे?

व्हॉट्सअॅपला भीम – यूपीआयबरोबर जोडून आम्हाला पेमेंट बँक सुरु करायची आहे. पेमेंट बँकेच्या माध्यमातून आम्हाला ग्राहकांना उपयुक्त आणि सुरक्षित अशी सेवा द्यायची आहे. त्यामुळे सरकारचे वित्तीय तसेच डिजिटल सक्षमीकरणाला मदत होऊन युजर्सना याचा फायदा होणार आहे. याबाबतचे पत्र नुकतेच व्हॉट्सअॅपचे प्रमुख क्रिस डॅनिअल यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला दिले आहे.

- Advertisement -

वाचा – आता व्हॉट्सअॅपवर दिसणार यूट्युब, इंस्टाग्रामचे व्हिडीओ


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -