घरटेक-वेक'फेक न्यूज'वर संशोधन करण्यासाठी व्हॉट्स अॅप देणार बक्षीस

‘फेक न्यूज’वर संशोधन करण्यासाठी व्हॉट्स अॅप देणार बक्षीस

Subscribe

भारत सरकारने नोटीस दिल्यानंतर व्हॉट्स अॅपने केले ३४ लाखाचे बक्षीस जाहीर.

व्हॉट्स अॅपवर फेक न्यूज पसरवणाऱ्याचे प्रमाण वाढत आहे. फेक न्यूजला आळा घालण्यासाठी अखेर व्हॉट्स अॅपनेच पाऊले उचलली आहे. फेक न्यूजवर लक्ष ठेऊन त्याचा स्त्रोताबद्दल माहिती देणाऱ्याला व्हॉट्स अॅप ३४ लाखाचे बक्षीस देणार आहे. मागील काही महिन्यांपासून फेक न्यूजमुळे वाढलेल्या हिसांचारामुळे भारत सरकारने हॉट्स अॅप आणि फेसबुकला नोटीस पाठवल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे. फेकन्यूज पसरवणाऱ्यांचे अकाऊंट बंद करण्यात येईल किंवा त्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ऑक्टोबर महिन्यात विजेत्यांची घोषणा केली जाणार असून एप्रिल २०१९ ला बक्षीस देण्यात येणार आहे. पीएचडी धारकांनाच या संशोधनासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

५० हजार डॉलर्सचे बक्षीस

फेकन्यूज बद्दलच्या संशोधनासाठी लागणारा निधी व्हॉट्स अॅप आणि फेसबुककडून दिला जाणार आहे. प्रत्येक संशोधकाला ५० हजार डॉलर्स (३४लाख रुपये) दिले जातील. फेक न्यूजवर संशोधन करणाऱ्यांसाठी व्हॉट्सअॅपद्वारे दोन कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. पहिल्या कार्यशाळेत चुकीची माहितीबाबत करण्यात येणाऱ्या संशोधनावर तपशील परिचय दिल्या जाईल. ऑक्टोबर महिन्यातील २९ ते ३० तारखे दरम्यान या कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत. पीएचडी धारकांना कार्यशाळेत भाग घेण्यासाठी व्हॉट् अॅपच्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा लागणार आहे. भारता सोबतच ब्राझील, इंडोनेशिया आणि मेक्सिको यादेशांमधील नागरिकांना अर्ज करता येणार आहे.

- Advertisement -

अर्जाच्या स्टेटसबाबत ई-मेलवर मिळणार माहिती 

अर्ज करणाऱ्याकडे पीएचडी डिग्री नसल्यास अर्जदाराने सामाजिक विज्ञान किंवा तांत्रिक संशोधन विषयावर काम केलेले असणे बंधनकारक आहे. १२ ऑगस्ट २०१८ रोजी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे. इच्छुक असलेल्या अर्जदारांबाबत १४ सप्टेंबरपर्यंत आपल्या अर्जाचे स्टेटस ई-मेलद्वारे कळवण्यात येईल.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -