घरदेश-विदेशबँकेत नोकरी मिळाली नाही म्हणून कोरोना दरम्यान उघडली SBI ची बनावट शाखा!

बँकेत नोकरी मिळाली नाही म्हणून कोरोना दरम्यान उघडली SBI ची बनावट शाखा!

Subscribe

बनावट कागदपत्रे छापणारे प्रिंटर आणि बँक चालानही युवकाकडून जप्त

कोरोनाचा कहर देशभरात सुरू असताना बँकेत नोकरी मिळाली नाही म्हणून कोरोना दरम्यान SBI ची बनावट शाखा उघडल्याचा प्रकार समोर आला आहे. पनरुतीजवळ भारतीय स्टेट बँक (एसबीआय) ची शाखा उघडण्याच्या प्रयत्नात एका १९ वर्षीय तरूणाला अटक करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण एसबीआयच्या माजी कर्मचाऱ्याचा मुलगा आहे. त्याने देशातील सर्वात मोठी असणारी बँक एसबीआयच्या नावे चालान, फॉर्म आणि इतर कागदपत्रे तयार केली होती. नोटा मोजण्याच्या मशीनसारखेच यंत्र त्यांनी शाखेत ठेवले जेणेकरुन लोकांना बँकेची खरी शाखा वाटेल. हे काम त्याने घराच्या वर केले. मात्र, त्याने घराबाहेर कोणतेही साइनबोर्ड ठेवले नाही.

- Advertisement -

एसबीआयच्या पानरुती शाखेच्या व्यवस्थापकाला एका ग्राहकाकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी चौकशीनंतर त्याला अटक केली आणि त्याच्याकडून सर्व बनावट कागदपत्र जप्त केले. बनावट कागदपत्रे छापणारे प्रिंटर आणि बँक चालानही त्याच्याकडून जप्त करण्यात आले.

या तरूणाचे वडील एसबीआयचे माजी कर्मचारी होते व त्यांचे निधन झाले आहे. त्याची आई देखील त्याच बँकेत नोकरी करत होती आणि ती सेवानिवृत्त झाली आहे. बँकेच्या कामकाजाची माहिती असून बँकेत काम करण्याची इच्छा असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की, चौकशी दरम्यान तो बालिश गोष्टी बोलत होता, तो म्हणाला की, मुंबईहून बँकेची शाखा उघडण्याच्या परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यानंतर त्याने साइनबोर्ड लटकवण्याचाही विचार केला. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांने बँकेत नोकरी मिळविण्याचा प्रयत्न केला, परंतु नोकरी मिळविण्यात तो अपयशी ठरला, त्यानंतर त्याने थेट असे पाऊल उचलले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -