घरट्रेंडिंगसुजिथचं बचावकार्य पाहत असता, स्वत:चीच मुलगी टबमध्ये बुडाली

सुजिथचं बचावकार्य पाहत असता, स्वत:चीच मुलगी टबमध्ये बुडाली

Subscribe

पालक टीव्हीवर चिकटून सुजिथ विल्सनचं बचावकार्य पाहत असताना, त्यांची चिमुकली टबमध्ये खेळताना बुडाली.

सुजिथ विल्सन नावाचा तामिळनाडूमध्ये राहणारा २ वर्षांचा चिमुकला, त्याच्या घराबाहेर खेळत असताना बोअरवेलमध्ये पडला. ही घटना २५ ऑक्टोबर शुक्रवारी घडली असून ४ दिवसांपासून सुजिथचं बचावकार्य सुरू होतं. त्याचं बचावकार्य टीव्हीवर लाइव्ह दाखवत असल्याने, सगळेच ते पाहत होते आणि सुजिथसाठी प्रार्थना करत होते. तर असेच पालक तामिळनाडू येथील थ्रेसुराम गावात सुजिथचे बचावकार्य टीव्हीवर पाहत होते आणि ते पाहत असताना त्यांचं त्यांच्या २ वर्षीय मुलीवर दुर्लक्ष झालं. रेवथी संजना, ही त्यांची मुलगी आत टबमध्ये खेळत होती, टबमध्ये खेळत असताना ती त्यात बुडाली. खूप वेळ ती आजुबाजुला दिसली नाही म्हणून तिचे पालक तिला घरात शोधू लागले.

तिला शोधल्यानंतर ती त्यांना टबमध्ये निश्चल अवस्थेत दिसली. तिच्या पालकांनी लगेच तिला जवळील रुग्णालयात घेउन गेले आणि तिथे तिला मृत घोषित करण्यात आले, असं पोलीस म्हणाले.

- Advertisement -

चार दिवसांच्या प्रखर बचावकार्यानंतर बचाव पथकांनी मंगळवारी पाहाटे ८८ फुट खोलातून सुजिथचं विघटित शरीर बाहेर काढलं. तब्बल ८० तास सुजिथचं बचावकार्य चाललं होतं. सुजिथ त्याच्या घराबाहेर खेळत असताना तो बोअरवेलमध्ये पडला होता. बोअरवेलमध्ये मुलं पडण्याची घटना ही काही नवीन नाही. अशा अनेक घटना कायम घटत असतात. जून महिन्यात देखील अशीच एक घटना पंजाब येथील संगरूर जिल्ह्यात घडलेली. तिथे देखील एक २ वर्षीय मुलगा तब्बल १५० फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला होता. त्याला ११० तासांनंतर बाहेर काढण्यात आलं. बोअरवेलवर कपडा टाकला असल्यामुळे त्याला ती दिसली नाही आणि त्यामुळे तो त्यात पडला. अशा घटना टाळण्यासाठी अशा खोल खड्ड्यांवर निरीक्षण ठेवलं पाहिजे.

हेही वाचा: आता सोने खरेदीची पावती नसेल, तर भरावा लागणार जबरदस्त कर!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -