घरट्रेंडिंग'डोनाल्ड ट्रम्प'साठी काम करता? मग चालते व्हा...

‘डोनाल्ड ट्रम्प’साठी काम करता? मग चालते व्हा…

Subscribe

डोनाल्ड ट्रम्पसाठी काम करते म्हणून 'त्या' महिलेला चक्क हॉटेलबाहेर घालवण्यात आले. नेमकं काय आहे यामागचं कारण?

अमेरिकेच्या ‘व्हाईट हाऊस’ची प्रमुख प्रवक्ता असलेली साराह सँडर्स हिच्यासोबत नुकताच एक विचित्र प्रकार घडला. शनिवारी साराह अमेरिकेच्या एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेली होती. मात्र, या हॉटेलमधून तिला चक्क बाहेर जा.. असं सांगण्यात आलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी साराह काम करत असल्यामुळे तिला थेट बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

ट्वीटरवरुन व्यक्त केला संताप

दरम्यान आपल्यासोबत घडलेल्या या अपमानास्पद प्रकाराबद्दलचा राग साराहने ट्वीटरवरुन व्यक्त केला. या ट्वीटमध्ये तिने म्हटलंय की, ”काल रात्री मी लेजिगंट रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले होते. मात्र, रेस्टॉरंटच्या मालकाने स्वत: येऊन मला तिथून बाहेर जायला सांगितलं. तुम्ही डोनाल्ड ट्रम्पसाठी काम करता त्यामुळे तुम्ही इथून बाहेर जा, असं त्यानी मला सांगितलं” पुढे त्यांनी लिहिलंय की, ”हॉटेलच्या मालकाचा माझ्यासोबतचा व्यवहार खूप अपमानास्पद होता. मी नेहमीच सगळ्यांशी चागलं वागत आले आहे. मी ज्यांच्याशी सहमत नसते त्यांच्याशीही मी समजूतदारपणेच वागते आणि यापुढेही मी माझं काम असंच सुरु ठेवीन”.

- Advertisement -


‘त्या’ हॉटेल मालकाचा पोबारा?

साराह सँडर्स यांच्यासोबत हॉटेलच्या मालकाने असा अपमानास्पद व्यवहार का केला? यामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये. ही घटना समोर आल्यानंतर अनेकांनी हॉटेल मालकाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र अजूनही त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. इतकंच नाही तर त्या हॉटेलची अधिकृत वेबसाईटही काम करत नाहीये. त्यामुळे या हॉटेल मालकाविषयी तऱ्हेतऱ्हेचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान याप्रकरणी स्थानिक नागरिकही सोशल मीडियातून आपला संताप व्यक्त करत आहेत. या घटनेनंतर अनेक लोकांनी त्या रेस्टॉरंटविरोधात एक सोशल मीडिया कॅंपेनही सुरु केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -