घरताज्या घडामोडीयेणारा काळ कठीण, जगभरातील लोकसंख्येच्या १० टक्के नागरिक कोरोनाबाधित - WHO

येणारा काळ कठीण, जगभरातील लोकसंख्येच्या १० टक्के नागरिक कोरोनाबाधित – WHO

Subscribe

संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा देखील वाढताना दिसत आहे. तसेच आतापर्यंत कोरोनामुळे १० लाखांहून अधिक जणांचा बळी गेले आहेत. अशा परिस्थितीत आता जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला आहे. जगभरातील लोकसंख्येच्या १० टक्के नागरिक हे कोरोनाबाधित आहेत, असे विधान जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. मायकेल रायन यांनी केले आहे. जगात प्रत्येक १० व्यक्तींमागे १ व्यक्ती कोरोनाबाधित झाली असल्याची शक्यता रायन यांनी वर्तवली आहे. त्यामुळे येणार काळ हा कठीण असून सर्वांनी काळजी घेण्याची गरज असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान कोरोनाबाधित असलेल्या रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत मायकेल रायन यांनी वर्तवलेली बाधितांची संख्या १० पट आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या ३४ व्या सदस्यीय समितीला मार्गदर्शन डॉ. मायकेल रायन करत होते. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी ही समिती काम करत आहे. याशिवाय फंडिंग देखील गोळा करण्यात काम ही समिती करत आहे. दरम्यान या समितीला मार्गदर्शन करताना रायन म्हणाले की, ‘कोरोना काळात सुरुवातील शहरी भागांमध्ये रुग्णांची संख्या वाढत होती. पण सध्या ग्रामीण भागांमध्ये रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. वेगवेगळ्या वयोगटांमधील रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढ आहे आणि हे जगातील सर्व देशांसाठी धोकादायक आहे.’ यासंदर्भात बोलताना रायन पुढे म्हणाले की, ‘जगभरातील लोकसंख्येच्या १० टक्के नागरिक हे कोरोनाबाधित आहेत. जगातील सध्या लोकसंख्या ७.६ अब्ज आहे. यामधील १० टक्के म्हणजेच ७६ कोटी नागरिक कोरोनाबाधित आहेत. म्हणून जगातील अनेक देशांना याचा मोठा धोका आहे.’

- Advertisement -

‘सध्या मध्य युरोप आणि भूमध्य समुद्राच्या पूर्वेच्या भागत मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहेत. तसेच दक्षिण आशियामध्ये रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. पण आफ्रिक आणि प्रशांत महासागराला लागून असलेल्या परिसरातील स्थिती सामान्य आणि दिलासादायक आहे. पण जगात पाहायला गेले तर कोरोनाचा वेग वाढत आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे महत्त्वाचे आहे’, असे रायन म्हणाले.


हेही वाचा – पंजाबचे ‘हे’ मंत्री आढळले कोरोना पॉझिटिव्ह; काल राहुल गांधींसोबत होते आंदोलनात

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -