घरदेश-विदेशभारतात मलेरिया घटला होsss, WHO चा अहवाल!

भारतात मलेरिया घटला होsss, WHO चा अहवाल!

Subscribe

जागतिक आरोग्य संघटनेने नुकताच जगातल्या ११ देशांमधल्या मलेरियाच्या रुग्णांचा आढावा घेणारा २०१६-१७ वर्षासाठीचा अहवाल जाहीर केला. या अहवालात भारतात या रुग्णांचं प्रमाण २४ टक्क्यांनी कमी झाल्याचं निदर्शनास आलं आहे.

देशभरात राबवण्यात येत असलेल्या विविध आरोग्यविषयक योजना आणि रुग्णांना पुरवली जाणारी सुविधा या पार्श्वभूमीवर भारतात मलेरियाचं प्रमाण घटल्याचं समोर आलं आहे. WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेकडून यासंदर्भातला २०१६-१७चा अहवाल जाहीर करण्यात आला असून त्यामध्ये एकूण ११ देशांची आकडेवारी मांडण्यात आली आहे. यामध्ये भारतात मलेरियाच्या रुग्णांच्या संख्येमध्ये २०१६ वर्षाच्या तुलनेत २०१७मध्ये घट झाल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे मलेरियाच्या बाबतीत जागतिक आरोग्य संघटनेच्या लेखी भारताच्या मानांकनामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे.

भारतातील रुग्णांची संख्या २४ टक्क्यांनी घटली!

२०१७ साली ११ देशांमध्ये मलेरियाचे सुमारे १५ कोटी एवढे रुग्ण आढळले होते. ज्याची संख्या मलेरियाच्या एकूण रुग्णांच्या ७० टक्के एवढी होती आणि याच काळात २ लाख ७४ हजार लोकांचा मलेरियामुळे मृत्यू झाला. जागतिक आरोग्य संघटनेचा संबंधित अहवाल तयार करताना ११ देशांचा समावेश करण्यात आला होता. ज्यात आफ्रिकेतील १० देश आणि आशियातून फक्त भारताचा समावेश आहे. त्यानुसार, २०१६ च्या तुलनेत २०१७ मध्ये आफ्रिकेतील १० देशांमध्ये आणखी ३.५ दशलक्ष म्हणजेच ३५ लाख मलेरियाचे रुग्ण असल्याचं समोर आलं. पण, दुसरीकडे भारतात मलेरियाच्या रुग्णांच्या संख्येत २४ टक्क्यांनी घट झाल्याचं स्पष्ट झालं आहे. डब्लूएचओच्या अहवालानुसार, जगातील मलेरिया रुग्णांपैकी २०१७ मध्ये ४ टक्के मलेरियाची प्रकरणं भारतातील आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – सेक्स केल्याने होणार मलेरियाच्या डासांचा खात्मा!

WHO देशपातळीवर काम करणार

मलेरियाचं प्रमाण आणि त्यामुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना आणि देशातील काही भागीदारांनी पुढाकार घ्यायला हवा आणि मलेरियावर उपचार आणि त्यासाठी लागणारी गुंतवणूक करून या जीवघेण्या आजारापासून लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत, असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

याविषयी डब्लूएचओचे महासंचालक डॉ. टेड्रोस घेब्रेयस यांनी सांगितलं, “मलेरियामुळे कुणाचा मृत्यू झालेला नाही. तरीही मलेरियाच्या रुग्णांची संख्या कमी करणं गरजेचं आहे. आपल्याला काहीतरी वेगळं करण्याची गरज आहे. त्यामुळे आम्ही सर्व देशांवर लक्ष केंद्रीत करून देशपातळीवर काम करण्याचं ठरवलं आहे.’

- Advertisement -

मुंबईत मलेरियाचं वाढतं प्रमाण

महापालिकेच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या अहवालानुसार, १५ ऑक्टोबर २०१८ पर्यंत मलेरिया रुग्णांची संख्या २०५ एवढी आहे. तर, सप्टेंबर महिन्यात एकूण ६२५ मलेरियाचे रुग्ण आढळले होते. सप्टेंबर महिन्याच्या पंधरावड्यात मलेरियामुळे एका व्यक्तीला जीव गमवावा लागला होता. तर मुंबईत ऑक्टोबर महिन्यात एकूण मलेरियाचे ४६१ रुग्ण आढळले होते.


तुम्ही हे वाचलंत का? – मुंबईकरांनो सावधान! डेंग्यू, मलेरिया पुन्हा पसरतोय
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -