घरदेश-विदेशपर्रिकरांनंतर आता मुख्यमंत्री कोण?

पर्रिकरांनंतर आता मुख्यमंत्री कोण?

Subscribe

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पर्रिकरांनंतर आता मुख्यमंत्री पदाचे सुत्रे कुणाकडे सोपवायचे? असा यक्षप्रश्न भाजपला पडला आहे.

गेल्या वर्षभरापासून मनोहर पर्रिकर आजारी होते. त्यांना कर्करोगाचे निदान झाले होते. पर्रिकर उपचारासाठी अमेरिकेतही गेले होते. पर्रिकरांच्या आजारपणामुळे भाजप गेल्या काही महिन्यांपासून मुख्यमंत्रीपदासाठी नव्या पर्यायाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होते. परंतु, भाजपला अद्यापही त्यात यश आले नाही. मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नेमकं मुख्यमंत्री कुणाला करायचे? असा यक्षप्रश्न भाजपपुढे उभा राहिला आहे. गोव्यात मुख्यमंत्री पद ठरवणं हे भाजपसाठी वाटतं तितकं सोपं नाही. कारण भाजपकडे स्वबळाचं सरकार नाही. भाजपच्या आघाडी सरकारमध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे तीन, गोवा फॉरवर्ड पार्टीचे तीन आणि तीन अपक्ष आमदार आहेत. विशेष म्हणजे या मित्र पक्षांनी गोव्यातील भाजप सरकारला नाही तर मनोहर पर्रिकर यांना समर्थन दिले होते. त्यामुळे मुख्यमंत्री ठरवणं भाजपसाठी आणखी कठीण होऊन बसलं आहे.

गोव्यात राजकीय घडामोडींना वेग; काँग्रसेला सत्तास्थापनेची झाली घाई

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गोव्यामध्ये सत्तास्थापनेसाठी काँग्रेसला घाई झाली आहे. त्यामुळे काँग्रेसने गोव्याचे राज्यपाल मृदुला सिन्हा यांना दुसऱ्यांदा पत्र लिहून सत्तास्थापनेचा दावा केला आहे. यानंतर भाजपचे नेते आणि केंद्रिय मंत्री नितीन गडकरी गोव्यामध्ये मध्यरात्रीपासून दाखल झाले आहेत. भाजप आणि मित्रपक्षांशी चर्चा करुन नितीन गडकरी मुख्यमंत्री पदाचे सुत्रे कोणाकडे सोपावयचे याची चाचपणी करीत आहेत.

- Advertisement -

प्रमोद सावंत यांचे नाव आघाडीवर

नितीन गडकरी यांनी काल रात्री गोवा फॉरवर्ड पार्टीचे विजय सरदेसाई आणि एमजीपीच्या सुधीन ढवळीकर यांच्याशी जवळपास दोन तास चर्चा केली. आज संध्याकळी यावर अखेरचा निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, गोवा विधानसभा सभापती प्रमोद सावंत यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी आघाडीवर आहे. सर्व मित्र पक्षही सावंत यांना पाठिंबा देऊ शकतात. प्रमोद सावंत यांच्यासोबतच श्रीपाद नाईक यांचही नाव चर्चेत आहे. मात्र, विरोधी पक्षांचा नाईक यांना विरोध आहे.


हेही वाचा – पर्रिकरांच्या निधानानंतर केंद्रात १ तर राज्यात ७ दिवसांचा दुखवटा जाहीर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -