कोरोना नेमका कुठून आला, याचा शोध WHO घेणार!

पुढच्या आठवड्यात WHO चीनला देणार भेट

New delhi
जागतिक आरोग्य संघटना

कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. या कोरोनामुळे मोठ्या देशांची अर्थव्यवस्था देखील धोक्यात आली आहे. या महामारीवर उपाय म्हणून जगभरातील देश लस तयार करण्यात गुंतले आहेत. दरम्यान, कोरोना विषाणूचे स्रोत शोधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) चीनला एक पथक पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. डब्ल्यूएचओ पुढील आठवड्यात चीनमधील आपली एक टीम पाठवणार आहे. ही टीमला कोरोनाचा प्रसार करणाऱ्या कोरोना विषाणूच्या जन्मस्थानाचा शोध घेणार असल्याचे सांगितले जात आहे.

पुढच्या काही दिवसांत WHO चीनला देणार भेट

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहनॉम गिब्रयेसॉस यांनी सोमवारी सांगितले की, ” आपल्याला कोरोना विषाणूबद्दल सर्व काही शोधण्याची गरज आहे, तरच आपण अधिक चांगले लढा देऊ शकू. कोरोना नेमका कोठून आले आहे हे शोधणे देखील आवश्यक आहे. यासाठी पुढील आठवड्यात आम्ही चीनला एक पथक पाठवित आहोत. आशा आहे की आम्ही व्हायरसचा नेमका स्रोत शोधून काढू. ”


जगभरात वाढतोय कोरोनाचा संसर्ग; WHO ने रेकॉर्ड ब्रेक रूग्णांची केली नोंद


नेमका कुठून आला कोरोना 

कोविड -१९ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोरोनो व्हायरसची महामारी जगभर पसरल्यापासून, सर्वांची नजर वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीकडे आहे. असे म्हटले जाते की वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमधून हा विषाणू जगभर पसरला आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण वुहानमध्ये आढळला, तेव्हापासून शास्त्रज्ञांनी व्हायरसच्या उत्पत्तीचा शोध घेणे सुरू केले जेणेकरुन लस तयार होण्यास मदत होईल. दरम्यान, चीनमधील वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीकडून ती ‘लीक’ झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. इथल्या शास्त्रज्ञांचे असे मत आहे की, कोरोना विषाणूचा जन्म मानवनिर्मित नसून निसर्गामध्ये झाला आहे.

या कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत जगभरात १ कोटींहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे आणि जवळपास साडेपाच लाख लोकांना आपला जीव कोरोनामुळे गमवावा लागला आहे. या कोरोना महामारीमुळे जगभरात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था पुर्ण ढासळली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here