घरदेश-विदेशतो व्हिडिओ कॉल ठरला रोहित शेखरच्या हत्येचे कारण

तो व्हिडिओ कॉल ठरला रोहित शेखरच्या हत्येचे कारण

Subscribe

काँग्रेसचे दिवंगत नेते एनडी तिवारी यांचे चिरंजिव रोहित शेखर उर्फ गुंजन (४०) याची हत्या झाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र दोन दिवसांनी पोलिसांनी रोहित यांच्या खूनाच्या आरोपाखाली त्यांची पत्नी अपुर्वा शुक्लाला अटक केली. अपुर्वाने प्रॉपर्टीच्या वादातून हा खून केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र आता या प्रकरणाला नवा ट्विस्ट मिळाला आहे. या प्रकरणात दोघात तिसरा असल्याचे आता समोर आले आहे.

अपुर्वाने रोहितचा खून का केला? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यापूर्वी त्या दोघांचे लग्न कसे झाले, हे पाहुया. २०१७ साली एका लग्न जुळवणाऱ्या संकेतस्थळावर त्या दोघांची ओळख झाली. रोहितने आपली आई उज्ज्वला यांना अपुर्वाचा प्रोफाईल दाखवला आणि त्यानंतर ते दोघे पहिल्यांदा लखनऊला भेटले. पहिल्याच भेटीत दोघांची चांगली मैत्री झाली. दोघेही जवळपास एक वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले. त्यानंतर १२ मे २०१८ रोजी दोघांनी लग्न केले. या लग्नाला दिल्लीतील राजकीय आणि सनदी अधिकाऱ्यांची हजेरी पाहायला मिळाली होती.

- Advertisement -

दोघात तिसरा

राहित आणि अपुर्वाच्या नात्यातील गोडवा जास्त दिवस टिकू शकला नाही. लग्नाच्या काही दिवसानंतरच रोहितची दूरची नातेवाईक त्यांच्या घरी वारंवार येत असल्याचे अपुर्वाच्या लक्षात आले. त्या महिलेची रोहितशी असलेली जवळीक अपुर्वाला खटकत होती. त्या महिलेमुळे दोघांमध्ये वरचेवर भांडण होऊ लागले. हे लग्न काही फार काळ टिकणार नाही, हे दोघांच्याही लक्षात आले. मध्यतंरी घटस्फोट घेण्यासंबंधीही दोघांनी चर्चा केली. यावर्षी जून महिन्यात घटस्फोट घ्यायचा असा निर्णय त्यांनी घेतला होता.

#P. K. Shukla and associates #indoreoffice #lawoffice #advocates #indore_city #lawyers #jailroad #indorehighcourt #indoresession #indorelowercourt

Apoorva Shukla ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಫೆಬ್ರವರಿ 11, 2019

- Advertisement -

त्या व्हिडिओ कॉलने घात केला

११ एप्रिल रोजी रोहित आणि उज्ज्वला दोघेही लोकसभेच्या मतदानासाठी आपल्या मूळ गावी उत्तराखंड येथे गेले होते. यावेळी रोहितची नातेवाईक महिला देखील त्यांच्यासोबत होती. अपुर्वा दिल्लीतच होती, तिला याबद्दल कोणतीही कल्पना नव्हती. मात्र एकेदिवशी अपुर्वाने रोहितला व्हिडिओ कॉल केला. त्यावेळी रोहितने मद्यपान केले होते आणि ती महिला त्याच्यासोबतच होती. दारूच्या नशेत रोहितने चुकून कॉल उचलला आणि अपुर्वाला व्हिडिओमध्ये ती महिला दिसली. अपुर्वासाठी मोठा धक्का होता.

त्यानंतर १५ एप्रिल रोजी रोहित पुन्हा दिल्लीतील आपल्या घरी परतला. १५ एप्रिलच्या रात्री १० वाजता रोहित, आई उज्ज्वला यांनी एकत्र जेवण केले. त्यानंतर रोहितने आपल्या आईला तिच्या टिळक नगर येथील घरी जाण्यासाठी गाडीपर्यंत सोडले. दुसऱ्या दिवशी उज्ज्वला पुन्हा डिफेन्स कॉलनीमधील रोहितच्या घरी आल्या. तेव्हा दुपारचे २ वाजले होते. रोहित अजूनही उठला नसल्याचे अपुर्वाने त्याच्या आईला सांगितले. त्यानंतर उज्ज्वला या रोहितच्या ड्रायव्हरला घेऊन मॅक्स हॉस्पिटलमध्ये गेल्या, जिथे त्यांची नेहमीप्रमाणे भेट ठरलेली होती. हॉस्पिटलमध्ये असतानाच त्यांना रोहितची तब्येत खालावली असल्याचा फोन आला. त्यानंतर त्या जेव्हा घरी पोहोचल्या तोपर्यंत डॉक्टरांनी रोहितला मृत घोषित केले होते.

#lawoffice #P. K. Shukla and associates#chambers of P. K. Shukla #indorehighcourt #indore_city

Apoorva Shukla ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಮಾರ್ಚ್ 25, 2019

 

अपूर्वाचा पर्दाफाश

शवविच्छेदन अहवाल येईपर्यंत सर्वांनाच हा नैसर्गिक मृत्यू असल्याचे वाटले होते. मात्र गुन्हे अन्वेषन विभागाच्या चौकशीत अपुर्वा वारंवार आपला जबाब बदलत असल्याचे जाणवले. अपुर्वाचे नख आणि केसांचे नमुने रोहितच्या शरीर आणि बेडरुममध्ये सापडलेल्या पुराव्यांशी जुळल्याचे लक्षात आले. जेव्हा पोलिसांनी डीएनए रिपोर्ट मॅच झाल्याचे अपुर्वाला सांगितले तेव्हा तिने स्वतःचा गुन्हा कबूल केला.

अपुर्वाने सांगितले की, १५ एप्रिलच्या रात्री जेवण झाल्यानंतर रोहित आणि तिच्यामध्ये जोरदार भांडण झाले. रोहितने भांडणादरम्यान तिला मारायला सुरुवात केली. मात्र तो दारू प्यायलेला असल्याने अपुर्वाने त्याच्यावर नियंत्रण मिळवले. त्यानंतर तिने स्वतःच्या हाताने रोहितचा जीव घेतला. सुप्रीम कोर्टात वकिली केल्यामुळे गुन्हा केल्यानंतर तिने पुरावेही नष्ट केले होते. मात्र डीएनए चाचणीमुळे अखेर सत्य समोर आले.

If dog could speak, I will never make friendship with human !!

Apoorva Shukla ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಗುರುವಾರ, ಮಾರ್ಚ್ 22, 2018

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -