घरदेश-विदेश'या' तीन कारणांमुळे भाजप सर्वात पुढे

‘या’ तीन कारणांमुळे भाजप सर्वात पुढे

Subscribe

सतराव्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानुसार भाजप सर्वाधिक जागांवर आघाडीवर आहे. भाजपच्या या यशामागे तीन महत्त्वाचे कारणे आहेत.

लोकसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहे. .यासाठी देशभरात मतमोजनी सुरु आहे. मतमोजनीच्या आकडेवारीनुसार देशात एनडीएचे सरकार येण्याची शक्यता आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २६ मे रोजी सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. दरम्यान, काँग्रेसला या निवडणुकीत अपयश आल्याचे बघायला मिळत आहे. त्यामुळे काँग्रेस अपयशी का ठरला? या मागील काही कारण आपण जाणून घेणार आहोत.

मोदींच्या प्रचारसभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात मोठ्या प्रमाणात प्रचारसभा घेतल्या. या प्रचारसभांचा चांगला फायदा भाजपला झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाल फक्त २ जागांवर यश मिळाले होते. मात्र या निवडणुकीत भाजप अवघ्या १४ जागांवर आघाडीवर आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रचारादरम्यान मोठा हिंसाचार झाला होता. तरिदेखील भाजपने चांगली उडी मारल्याचे दिसत आहे. पश्चिम बंगालमध्ये विजयामागे मोदी आणि अमित शहा यांचीच प्रचारसभा महत्त्वाची होती.

- Advertisement -

पाच वर्षात एकही घोटाळा नाही

२०१४ साली निवडून आल्यापासून गेल्या पाच वर्षात भाजप सरकारच्या काळात एकाही भाजप नेत्याबाबत घोटाळ्याची माहिती समोर आलेली नाही. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर राफेल प्रकरणी भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. याच आरोपाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ते ‘चौकीदार चोर है’ असे म्हटले होते. परंतु, तरीही जनतेचा कल मोदी सरकारच्या बाजूने झुकला. यामागील कारण म्हणजे भाजपच्या एकही नेत्यावर भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध झाला नाही.

बालाकोट एअर स्ट्राईक

पाकिस्तान शिरुन भारतीय हवाई दलाने बालाकोटमध्ये एअर स्टाईक केला होता. या एअर स्ट्राईकमध्ये जैश ए मोहम्मदचे तळ हवाई दलाने उद्धवस्त केले होते. या एअर स्ट्राईकमध्ये २०० ते ३०० दहशतवादींचा खात्मा झाल्याची माहिती समोर येत होती. परंतु, काँग्रेसकडून या एअर स्ट्राईकचे पुरावे मागितले जात होते. त्यामुळे काँग्रेसची ही भूमिका जनतेला आवडली नसल्याचे समोर आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -