घरदेश-विदेशवाचा - दारुड्यांना डास दुपटीने चावतात

वाचा – दारुड्यांना डास दुपटीने चावतात

Subscribe

निर्व्यसनी माणसाला हैराण कराणारे डास दारुड्यांना दुपटीने चावतात.

कोणत्याही ऋतूमध्ये डास हे घरात येत असतात. मात्र या डासांना घरातून बाहेर काढणे देखील कठीण असते. तसेच डासांचा प्रादुर्भाव आणि त्यांच्या चावण्याने येणारा वैताग ही खरंतर खूप सामान्य बाब आहे. मात्र निर्व्यसनी माणसाला हैराण कराणारे डास दारुड्यांना मात्र त्याच्या दुपटीने चावतात, असं वैद्यकीय परीक्षणात निष्पन्न झाले आहे. विशेष बाब म्हणजे दारुड्या माणसाला चावणाऱ्या डासांवर दारुचा काहीही परिणाम होत नसल्याचेही समोर आले आहे.

यामुळे दारुड्यांना मच्छर अधिक त्रास देते

दारुड्या माणसांच्या रक्तात दारु प्यायल्यानंतर तयार होणारे ऑक्टोनॉल नावाच्या रसायनाचा गंध डासांना येतो. तसेच, दारु प्यायल्यानंतर माणसाच्या घामावाटे बाहेर पडणारे इलेनॉल नावाचे रसायनही डासांना समजते. त्यामुळे दारुड्या माणसांना डास जास्त चावतात.

- Advertisement -

संशोधनातून हे आले समोर

लंडन, अमेरिकासारख्या देशांनी डासांच्या चावण्यावर विविध संशोधन केले आहे. त्या संशोधनात त्यांना डासांच्या या सवयीचा शोध लावण्यात आला आहे. सामान्यत: डास हे फळांचा रस शोषतात. पण, त्यातील मादी डास मानवी रक्त पिते. याचे कारण रक्तातून मिळणारी प्रथिने तिला अंडी घालण्यासाठी उपयुक्त असतात. पण, आसपास मानवी अस्तित्व असल्याचे डासांना कार्बन डायऑक्साईडच्या वायूमुळे समजते. कार्बन डायऑक्साईड वायूमुळे डासांना मानवी अस्तित्वाची जाणीव करुन देतात.

डासांच्या पचन यंत्रणेत अल्कोहोल पचवण्याची क्षमता

दारुड्यांना डास दुपटीने चावतात. कारण, १० पेग प्यायल्यानंतरही मानवी रक्तातलं अल्कोहोलचे प्रमाण ०.२ इतके असते. त्यामुळे त्याचा काहीही परिणाम डासांवर होत नाही. तसेच डासांच्यापचन यंत्रणेत अल्कोहोल पचवण्याची क्षमता असते. त्यामुळे दारुड्या माणसाला चावून डास झिंगत नसल्याचे देखील समोर आले आहे.

- Advertisement -

वाचा – अशी करा डासांपासून सुटका

वाचा – ‘गुगल’ करणार जगभरातील डास नष्ट…


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -