रूपयाच्या घसरणीमुळे भारतासमोर गंभीर संकट?

आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये रूपयाची किंमत ७२ रूपये झाली आहे. ही बाब भारतासाठी चिंतेची आहे. वेळीच पावलं न उचलली गेल्यास भारताला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.

Mumbai
one rupee coin
आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये रूपयाची घसरण कायम

आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या रूपयाची घसरण जोरात सुरू आहे. मागील १५ दिवसामध्ये जवळपास ८ रूपयाने रूपयाची घसरण झाली आहे. आजघडीला रूपया प्रति डॉलर ७२ रूपयाला जाऊन पोहोचला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ही बाब चिंतेची आहे. रिझर्व्ह बँकेनं हस्तक्षेप करून रूपयाची घसरण रोखणं गरजेचं आहे. अन्यथा पुढील काळात भारताला आर्थिक संकटांचा सामना करावा लागेल. रूपयाच्या घसरणीमागे कारणे, उपाय आणि त्यामुळे होणारा परिणाम…

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कशी ठरते रूपयाची किंमत?

आंतरराष्ट्रीय बाजारात रूपयाची किंमंत ही प्रामुख्याने आयात आणि निर्यात धोरणावर ठरते. विकासदर हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे घसरणारा विकासदर हा भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चिंतेची बाब आहे.

रूपयाच्या घसरणीला कारणीभूत घटक

१ ) भारताच्या निर्यातीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर घसरण झाली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये रूपयाच्या किंमतीवर त्याचा परिणाम होत आहे.
२ ) दुसरीकडे निर्यात कमी होत असताना आयात मात्र मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे रूपयाची घसरण ही कायम आहे. मुख्यता भारत जी आयात करत आहे ती युरोप आणि अमेरिकेकडून होत आहे. भारत आणि अमेरिकेमध्ये व्यापार हा २ टक्क्यापेक्षा जास्त नाही. मात्र त्यानंतर देखील रूपया आणि डॉलरच्या विनिमय दरामध्ये मोठी तफावत आहे.
३ ) भारताचा विकार दर देखील खालावला आहे. त्याचवेळी निर्यात देखील खाली जाणं भारतीय अर्थव्यवस्थेला परवडणारे नाही.
४ ) रूपयाची घसरण होत असताना रिझर्व्ह बँकेनं हस्तक्षेप न केल्यानं त्याचा परिणाम हा रूपयाच्या घसरणीवर होत आहे.

रूपयाच्या घसरणीमुळे होणारे परिणाम

१ ) रूपयाची घसरण सुरू राहिल्यास आर्थिकमंदीचा सामना करावा लागू शकतो.
२ ) आर्थिकमंदी आल्यास त्याचा परिणाम हा उत्पादन क्षमतेवर होईल. परिणामी, देशामध्ये बेरोजगारी वाढेल.
3 ) रूपयाची घसरण कायम राहिल्यास परदेशामध्ये शिक्षणासाठी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागेल. रूपयाची घरसण कायम राहिल्यास परदेशीत शिक्षण अर्थात शैक्षणिक कर्ज महागणार हे नक्की!
४ ) आंतरराष्ट्रीय स्तरावरील विनिमय दरावर देखील त्याचा परिणाम होत आहे.
५ ) देशामध्ये महागाई देखील वाढली आहे.
६ ) पेट्रोल – डिझेलच्या दरामध्ये वाढ होत आहे.
७ ) रूपयाची घसरण कायम राहिल्यास कर्ज महाग होऊ शकतं.

रूपयाची घसरण रोखण्यासाठी काही ठोस उपाय

१ ) रिझर्व्ह बँकेचा हस्तक्षेप हा महत्त्वाचा आहे. बँकेकडे असलेला डॉलरचा साठा हा बाजारामध्ये खेळता करणे गरजेचे आहे.
२ ) भारताने आयात कमी करून निर्यात वाढवणे गरजेचे आहे.

रूपयाच्या घसरणीचा कुणाला होतोय फायदा

१ ) रूपयाची घसरण कायम असणे ही नक्कीच चिंतेची बाब आहे. पण परदेशामध्ये जे भारतीय आहेत त्यांना मात्र गुंतवणुकीसाठी ही चांगली संधी आहे. भारतामध्ये त्यांनी घरांसाठी गुंतवणूक केल्यास त्यांना नक्की फायदा होऊ शकतो. जमिन किंवा घरामध्ये गुंतवणूक करणे हे फायद्याचं आहे.
२ ) रूपयाची घसरण जरी कायम असली तरी सरकारी तिजोरीला मात्र त्याचा फायदा होत आहे. कारण पेट्रोल – डिझेलच्या दरामध्ये वाढ झाल्यानं सरकार आणि तेल कंपन्यांना त्याचा फायदा होत आहे. पण, सामान्यांचा खिसा मात्र रिकामा होतोय.

वाचा – पेट्रोल – डिझेलच्या वाढत्या किमती आणि आंतरराष्ट्रीय राजकारण!!