घरदेश-विदेशराष्ट्राध्यक्षांसमोर रॅपरने दिल्या शिव्या

राष्ट्राध्यक्षांसमोर रॅपरने दिल्या शिव्या

Subscribe

कृष्णवर्णीय नागरिकांविषयी व्हाईट हाऊसमध्ये मीटिंगदरम्यान घडला प्रकार. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही झाले हैराण.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नेहेमीच विविध कारणांसाठी चर्चेत असतात. व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या एका मीटिंगमुळे ट्रम्प पुन्हा चर्चेचा विषय बनले आहे. लोकांच्या प्रश्नावर राष्ट्राध्यक्षांची चर्चा करण्यासाठी कलाकार आणि खेळाडू व्हाईट हाऊसमध्ये जमले होते. यावेळी प्रसारमाध्यमांनीही ट्रम्प यांच्या कार्यालयात हजेरी लावली. लोकांच्या प्रश्नांवर डोनाल्ड ट्रम्प काय भूमिका घेणार आहे याकडे सर्वांचे लक्ष आहे. अमेरिकेचा प्रसिद्ध रॅपर कॅन्ये वेस्ट (Kanye West) आणि पूर्व माजी फूटबॉल खेळाडू जिम ब्राउन (Jim Brown) यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. अमेरिकेत कृष्णवर्णीयांवर वाढती हिंसा हा या मीटिंगचा मुख्य विषय होता. या मीटिंगमध्ये व्हाईट हाऊसचे सल्लागार जेरार्ड कुशनर (jared kushner) आणि ट्रम्प यांची मुलगी इव्हांका ट्रम्प (ivanka trump) ही उपस्थीत होते. दरम्यान मीटिंगमध्ये रॅपर कॅन्ये आणि खेळाडू ब्राउन यांच्याप्रश्नांना ट्रम्प यांनी दिलेल्या उत्तरामुळे प्रसारमाध्यमांनी त्यांना धारेवर धरले आहे.

शिकागोतील समस्यांचे काय?

या बैठकीचा व्हिडिओसमोर आला आहे. याव्हिडिओत कॅन्ये ट्रम्प यांच्यासमोर आपले मुद्दे मांडत असताना शिव्या देतांना दिसला. ट्रम्प यांनी त्याचे मुद्दे पूर्णपणे ऐकून घेतले. अमेरिकेच्या शिकागोमध्ये आफ्रिकेतील नागरिक मोठ्या संख्येने राहातात. शिकागोमध्ये गुन्ह्याचे प्रमाण वाढते आहे. शिकागोतील नागरिकांसाठी रोजगार मिळवून देण्याचे ट्रम्प यांनी प्रयत्न केले पाहिजे. ट्रम्प हे एक चांगले व्यक्ती आहे माझ्यासाठी ते ‘सुपरमॅन’ आहेत असे कॅन्ये म्हणाला. मीटिंगदरम्याने कॅन्येने ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ लिहिलेली टोपी घातली होती. या मीटिंगनंतर ट्रम्प या दोघांसोबत जेवले. यावेळी प्रसारमाध्यमांना दूर ठेवण्यात आले होते. मांडलेल्या मुद्यांवर ट्रम्प लवकरच भूमिका घेतील असे आश्वासन देण्यात आले आहे.

- Advertisement -

सौजन्य – सीबीसी न्यूज

- Advertisement -

“भविष्याबद्दल विचार करणे सोडा आपण आजचा विचार केला पाहिजे. लोकांना मजबूत करण्याच्या दृष्टीने सरकारने योजना आखली पाहिजे.”- कॅन्ये वेस्ट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -