घरदेश-विदेशनवरा दिसायला काळा असल्याने पत्नीने त्याला पेट्रोल टाकून जिवंत जाळले

नवरा दिसायला काळा असल्याने पत्नीने त्याला पेट्रोल टाकून जिवंत जाळले

Subscribe

सत्यवीर सिंह घरामध्ये झोपला होता. त्याचवेळी त्याची पत्नी प्रेमश्रीने त्याच्यावर पेट्रोल टाकले आणि पेटवून दिले.

उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका २२ वर्षिय महिलेने तिच्या पतीला जिवंत जाळले. कारण ऐकले तर सर्वांना धक्का बसेल. या महिलेने ऐवढे मोठे पाऊल यासाठी उचलले कारण तिच्या पतीचा रंग काळा होता आणि तो तिच्यापेक्षा २ वर्षाने मोठा होता. ही महिला पती काळ्या रंगाचा असल्यामुळे त्याला पसंद करत नव्हती.

अशी घडली घटना 

फतेहगडचे पोलीस अधिकारी सहदेव सिंह यांनी सांगितेल की, प्रेमश्री आणि सत्यवीर सिंह यांचे लग्न दोन वर्षापूर्वी झाले होते. सत्यवीर प्रेमश्रीपेक्षा दोन वर्षाने मोठा होता. तसंच त्याचा रंग काळा होता. त्यामुळे प्रेमश्रीला तो अजिबात आवडत नव्हता. या दोघांना पाच महिन्याचा मुलगा देखील आहे. ही घटना सोमवारी पहाटे साडेपाच वाजता घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्यवीर सिंह घरामध्ये झोपला होता. त्याचवेळी त्याची पत्नी प्रेमश्रीने त्याच्यावर पेट्रोल टाकले आणि पेटवून दिले. यावेळी प्रेमश्री देखील जखमी झाली असून तिचा पाय जळाला आहे.

- Advertisement -

पत्नीविरोधात गुन्हा दाखल 

सत्यवीर सिंहच्या भावाने सांगितले की, ‘वहिणी प्रेमश्रीला माझा भाऊ आवडत नव्हता. तो दिसायला काळा असल्यामुळे ती त्याला नेहमी भांडण करत असे आणि टोमणे मारत असे. सत्यवीरला ती खूप आवडायची म्हणून तो तीला कधीच काही बोलायचा नाही. आम्हाला माहिती नव्हते की वहिणी ऐवढे मोठे पाऊल उचलेल.’ दरम्यान, पोलिसांनी सांगितले की, सत्यवीर सिंह याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी प्रेमश्रीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा – 

- Advertisement -

एकतर्फी प्रेमातून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीला जिवंत जाळले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -