घरट्रेंडिंगशबरीमाला : तृप्ती देसाई 'गनिमी काव्या'ने घुसणार मंदिरात

शबरीमाला : तृप्ती देसाई ‘गनिमी काव्या’ने घुसणार मंदिरात

Subscribe

केरळ्याच्या शबरीमाला मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई कोची विमानतळावर पोहचल्या मात्र त्यांना मंदिराकडे जाण्यास विरोध करण्यात आला. कोची विमानतळावरुनच त्यांना परत पाठवण्यात आले.  दरम्यान केरळमधून परतल्यानंतर तृप्ती देसाईंनी ANI वृत्तसंस्थेशी बोलताना याविषयी स्पष्टीकरण दिले. तृत्ती देसाई म्हणाल्या की, ‘कोची एअरपोर्टवर काही हिंसा व्हावी अशी माझी अजिबात इच्छा नव्हती. म्हणूनच मी परत आले. यावेळी आम्ही सबरीमाला मंदिरात जाणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र, आता पुढच्यावेळी आम्ही न सांगता शबरीमाला मंदिरात जाणार. यासाठी आम्ही गनिमी काव्याचा (गोरिला रणनिती) वापर करणार’. तृप्ती देसाई मुंबई एअरपोर्टवर एएनआयशी बोलत होत्या. दरम्यान, कोचीवरुन मुंबईला परतल्यानंतर आता तृप्ती देसाई पुण्याकडे रवाना झाल्या आहेत. कोची विमानतळावर झालेल्या जोरदार विरोधामुळे तृप्ती देसाईंना शबरीमाला मंदिराचे दर्शन न घेताच परतावे लागले. मात्र, पुन्हा जेव्हा आम्ही शबरीमाला मंदिराचे दर्शन घेण्यासाठी कोचीमध्ये जाऊ, त्यावेळी आमच्या सुरक्षेची काळजी घेतली जाईल, असं आश्वासन पोलिसांनी दिलं असल्याचंही तृप्ती देसाई यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, शबरीमाला मंदिरात जाण्यासाठी आता आम्ही गनिमी काव्याचा वापर करु.. या तृप्ती देसाईंच्या वक्तव्यामुळे आता एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

कोची विमानतळावर नाट्यमय विरोध

शबरीमालाचं दर्शन घेण्यासाठी गेलेल्या तृप्ती देसाई यांना कोची विमानतळावर जोरदार विरोध झाला होता. एका आंदोलकाने तर तृप्ती देसाई परत गेल्या नाहीत तर त्यांना आमच्या छातीवर पाय देऊन मंदिरात जावं लागेल, असा इशाराही त्यांना दिला होता. याशिवाय कोची विमानतळाबाहेर उभ्या असलेल्या टॅक्सी चालकांनीदेखील तृप्ती देसाईंना मंदिराकडे नेण्यास नकार दिला. त्यांना विरोध करणाऱ्या अनेक महिला सकाळपासूनच कोची विमानतळावर ठिय्या देऊन बसल्या होत्या. दरम्यान, या सगळ्या नाट्यमय प्रकारामुळे तृप्ती देसाई आणि त्यांचे सहकारी तब्बल १२ तास कोची विमानतळावर बसून होते. शबरीमला मंदिरात प्रवेश करून दर्शन घेतल्याशिवाय आपण परत जाणार नाही असे तृप्ती देसाईंनी सांगितले होते. मात्र आंदोलकांचा विरोध पाहता त्यांना तसंच माघारी परतावं लागलं.

- Advertisement -

सुरक्षेच्या मागणीवर उत्तर नाही

तृप्ती देसाई यांनी १७ नोव्हेंबरला आपण शबरीमाला मंदिरात जाणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार त्यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांना एक पत्रही लिहिले होते. मंदिर प्रवेशादरम्यान आपल्याला सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली होती. मात्र केरळ सरकारकडून शेवटपर्यंत त्यांच्या या पत्रावर काहीच उत्तर आले नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -