मिशांचा नवा ट्रेंड: मिशा असाव्या तर अभिनंदनसारख्या

सोशल मीडियावर अभिनंदन यांच्या मिशाचे कौतुक केले जात आहे. सर्वांनी सोशल मीडियावर असे लिहिले आहे की, मिशा असाव्यात तर अभिनंदन यांच्या सारख्या आणि मी तशाच मिशा ठेवणार आहे.

Bangaluru
Abhinandan Varthaman's moustache style
अभिनंदन यांच्या मिशाची तरुणांमध्ये क्रेझ

आपल्या देशात मिशांना खूप महत्व दिले जाते. मिशा बहादुरीचे प्रतिक देखील मानले जाते. सध्या या मिशांचा ट्रेन्ड आला आहे. त्यामागचे कारण ही तितकेच खास आहे. पाकिस्तानचे विमान पाडून पाकिस्तानच्या तावडीतून सुखरुप परत आलेले भारताचे विंग कमांडर अभिनंदन यांच्यावर तर जगभरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या शौर्याची गाथा सगळ्यांना माहिती आहे. या वीरपुत्राच्या कामगिरीने अनेकांच्या माना उंचावल्या त्याचे कौतुक होत आहे. अशातच सर्व तरुणांकडून त्यांच्या मिशांचे खूप कौतुक होत आहे. मिशा पाहिजे तर अभिनंदन यांच्या सारख्या असे प्रत्येक तरुणांना वाटत आहे. आता तर त्यांच्या मिशांसारखा ट्रेंड आला असून त्यांच्याप्रमाणे मिशा ठेवण्यासाठी तरुणांनी सलूनमध्ये मोठी गर्दी केली आहे. सोशल मीडियावर तर अभिनंदन यांच्यासोबत त्यांच्या मिशाचा ट्रेंड आला आहे.

देशभारीतल सर्व तरुणांणांसाठी अभिनंदन हे हिरो बनले आहेत. त्यांची स्टाईल आता सर्वच तरुण मारत आहेत. अनेक तरुणांनी अभिनंदन यांच्यासारख्या मिशा ठेवायला सुरुवात केली आहे. दरम्यान, बंगळुरुच्या मोहम्मद चांदनेह अभिनंदन यांच्यासारख्या मिशा ठेवल्या आहेत. अभिनंद हे आमचे खरे हीरो आहेत, त्यांचा मी मोठा फॅन आहे, त्यांची स्टाईल आपल्याला आवडल्याचे चांद याने सांगितले आहे. काही तरुणांनी तर सोशल मीडियावर अभिनंदन यांच्या मिशाचे कौतुक केले आहे. सर्वांनी सोशल मीडियावर असे लिहिले आहे की, मिशा असाव्यात तर अभिनंदन यांच्या सारख्या आणि मी तशाच मिशा ठेवणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here