घरदेश-विदेशकार्ड नाही? ATMमधून बिनधास्त काढा पैसे

कार्ड नाही? ATMमधून बिनधास्त काढा पैसे

Subscribe

पुढील काळात कार्ड जवळ नसले तरी तुम्ही एटीएममधून पैसे काढू शकणार आहात. यूपीआय अर्थात युनिफाइड पेमेंट इंटरफेस पेमेंट सेवेच्या माध्यमातून आणि क्यू आर कोडच्या साह्याने एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा भविष्यात उपलब्ध होणार आहे.

अरेरे! घरी कार्ड विसरलो. आता पैसे कसे काढणार? अशी पंचायत अनेकवेळा होते. कार्ड जवळ नसल्यानं अनेकांची फजिती देखील होते. पण आता काहीही काळजी करण्याची गरज नाही. कारण तुमच्याकडे आता कार्ड नसेल तरी पैसे काढता येणार आहेत. विश्ATMमधूनवास नाही बसत ना? पण होय, पुढील काळात कार्ड जवळ नसले तरी तुम्ही एटीएममधून पैसे काढू शकणार आहात. यूपीआय अर्थात युनिफाइड पेमेंट इंटरफेस पेमेंट सेवेच्या माध्यमातून आणि क्यू आर कोडच्या साह्याने एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा भविष्यात उपलब्ध होणार आहे. बहुतांश बँकांनी एटीएमविषयक सेवा पुरवणाऱ्या एजीएस ट्रॅन्झॅक्ट टेक्नॉलॉजिसने ही प्रणाली विकसित केली आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं संमती दिल्यानंतर सर्व बँकांच्या ATMमधून ही सेवा मिळणार आहे.

मुख्य बाब म्हणजे सद्यस्थितीतल एटीएममध्ये कोणताही बदल करण्याची गरज नसणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -