घरदेश-विदेशछेडछाड करणाऱ्या इसमाला महिलेने चपलेने मारले

छेडछाड करणाऱ्या इसमाला महिलेने चपलेने मारले

Subscribe

छेडछाड करणाऱ्या एका इसमाला महिलेने चांगलीच अद्दल घडवली आहे. या इसमाला महिलेने चपलीने चोप दिला. मार खाल्यानंतर इसमाने महिलेच्या चरणी लोटांगण घालून माफी मागितली.

उत्तराखंडच्या डेहराडून येथे एका महिलेने छेडछाड करणाऱ्या इसमाला चांगलीच आद्दल घडवली आहे. हा इसम गेल्या काही दिवसांपासून महिलेचा पाठलाग करत होता. सोमवारी संध्याकाळी या इसमाने आपल्या मर्यादा ओलांडल्या. त्याने महिलेचा हात धरला आणि तिला सोबत चालायला सांगितले. त्याचा छळाला वैतागलेल्या महिलेने त्याला चांगलीच आद्दल घडवली. महिलेने त्याला चप्पलने मारहाण केली. ही मारहाण पाहण्यासाठी पाहणाऱ्यांची मोठी गर्दी जमली होती. अखेर गर्दी पाहून या इसमाने महिलेच्या चरणी लोटांगण घातले.

काय आहे नेमकं प्रकरण?

रामनगर रोड येथील स्टेडियमजवळ महिला वास्तव्यास आहे. ती लोकांची धुणीभांडी करुन स्वत: चा आणि परिवाराचा उदरनिर्वाह करते. गेल्या काही दिवसांपासून एक इसम तिच्या पाठी लागला होता. तो तिचा सतत पाठलाग करायचा. महिलेने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, सोमवारी संध्याकाळी त्याने हद्दच केली. त्याने महिलेचा जाण्याचा मार्ग अडवला आणि सोबत चालायला सांगितले. यानंतर संतापलेल्या महिलेने पायातील चप्पल काढून त्याला चांगलाच चोप दिला. हा सर्व प्रकार पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी रस्त्यावर जमली. ही गर्दी पाहून त्या इसमाने महिलेची माफी मागत पायाशी लोटांगण घातले. महिलेने त्याला माफीवर सोडले जरी असले तरी पुन्हा असाप्रकार केला तर सोडणार नाही, असा दम दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -