पत्नीने केला नवऱ्यावर बलात्काराचा आरोप

एका नवविवाहित महिलेने नवऱ्याविरोधात बलात्कार केल्याप्रकरणी तक्रार दाखल केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलीस वकीलांची मदत घेत असून तपास करीत असल्याचे सांगत आहेत.

Kolkata
woman constable rape by her Colleague in MUZAFFARNAGAR

एका नवविवाहित महिलेने नवऱ्याविरोधात बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली आहे. आपला नवरा मनाविरुद्ध शरीरसुखासाठी जबरदस्ती करत असल्याचा आरोप करत तिने पोलिसात धाव घेतली आहे. ही घटना कोलकाता येथे घडल्याचे समोर आले आहे. आपल्या नवऱ्यांने आपली फसवणूक केल्याचा आरोप देखील या महिलेने केला आहे.

नेमके काय घडले?

कोलकत्याच्या सिंथी भागात राहणाऱ्या एका नवविवाहित महिलेने नवऱ्याविरोधात बलात्काराची तक्रार केल्याची घटना समोर आली आहे. तसेन नवरा मनाविरुद्ध शरीरसुखासाठी जबरदस्ती करतो असा आरोप या महिनेने केला असून सासह – सासरेही हुंडयासाठी आपला छळ करत असल्याची तक्रार तिने केली आहे. गर्भवती झाल्यानंतरही नवरा मारहाण करत असल्याने तिने अखेर कोर्टात धाव घेतली आहे.


वाचा – मुंंबईत मनोरूग्ण तरूणीवर बलात्कार


फसवणूक केल्याचा आरोप

ज्यावेळी आमचे लग्न ठरले त्यावेळी आमच्या कुटुंबाला नवरा एका खासगी बॅंकेत वरिष्ठ अधिकारी पदावर कार्यरत असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र ज्यावेळी लग्न झाले त्यावेळी नवरा मुलगा बॅंकेत कामाला नसून एका खासगी कंपनीत ज्युनियर पदावर काम करत असल्याचे तिला समजले. तसेच काही दिवसांनी त्यांने कामावर जाणे देखील बंद केले होते. त्यामुळे आपली फसवणूक केल्याचा आरोप या महिलेने केला आहे.


वाचा – सुलतानपूरमध्ये ८ वर्षाच्या मुलीवर बलात्कार


म्हणून घेतली कोर्टात धाव

आपली फसवणूक झाल्याने पत्नीने नवऱ्याला टाळायला सुरुवात केली. मात्र नवऱ्याने आपल्यावर जबरदस्ती केल्याचा आरोप महिलेने नवऱ्यावर केला आहे. त्यामुळे अखेर कोर्टात धाव घेतल्याचे महिलेने सांगितले. तसेच पोलीस सर्व अंगांनी तपास करत असून वकीलांचीही मदत घेत असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here