घरदेश-विदेशव्यभिचारी सूनेचा सर्पदंश करुन सासूने काढला काटा

व्यभिचारी सूनेचा सर्पदंश करुन सासूने काढला काटा

Subscribe

एका व्यभिचारी सूनेने सासूला सर्पदंश करत तिचा काटा काढल्याची धक्कादायक घटना राज्यस्थानमध्ये घडल्याचे समोर आले आहे.

एका व्यभिचारी सूनेने सासूला सर्पदंश करत तिचा काटा काढल्याची धक्कादायक घटना राज्यस्थानमध्ये घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सून अल्पना, मनीष आणि त्याचा मित्र कृष्णा कुमार या आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेचा दीड महिन्याने उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.

नेमके काय घडले?

राजस्थान येथील झुंझुनू या जिल्ह्यातील एका गावात एक कुटुंब राहते. या कुटुंबामध्ये अल्पना तिच्या सासूसोबत राहत होती. कारण अल्पनाचा नवरा सचिन आणि त्याचा भाऊ चिरंतन भारतीय सैन्य दलात कार्यरत आहेत. तर अल्पनाचे सासरे राजेश हे कामानिमित्त बाहेर राहायचे. त्यामुळे घरात सासू सुबोध देवी आणि अल्पना दोघीच रहायच्या. अल्पनाचे १२ डिसेंबर २०१८ रोजी सचिनसोबत विवाह झाला होता. मात्र, ते भारतीय सैन्यात असल्यामुळे ते घरी यायचे नाही. दरम्यान, अल्पनाचे गावातील एका मनीष या युवकासोबत प्रेम झाले आणि त्यांच्या सतत भेटण्याने तिच्यावर सासूने अल्पनावर संशय घेतला. मात्र, आपले असे काही नाही, असे म्हणत तिने त्यांचा आरोप फेटाळून लावला. परंतु, सासून अल्पनाचा पाटलाग करुन तिचे फोन कॉल्स चेक करुन तिला रंगेहाथ पकडले. दरम्यान, या घटनेची माहिती आपल्या पतीला कळणार या भितीने अल्पनाने मनीष आणि त्याच्या मित्राच्या साथीने कट रचून सापाने दंश केल्याचे सांगत सासूची हत्या केली. या घटनेचा तपास केला असता ही हत्या केल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – महिलांच्या सुरक्षितेसाठी तयार केली ‘लिपस्टिक गन’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -