घरदेश-विदेशVideo : 'व्हॅलेंटाईन डे'ला तिनं केल राहुल गांधींना 'किस'

Video : ‘व्हॅलेंटाईन डे’ला तिनं केल राहुल गांधींना ‘किस’

Subscribe

अनं तिनं केलं राहुल गांधींना किस

काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांचा सध्या गुजरातमध्ये दौरा सुरु आहे. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारविरोधात आक्रमक झालेले राहुल गांधी यांनी आज राजस्थान आणि गुजरातचा दौरा केला. या दौऱ्यावेळी दोन्ही राज्यांत त्यांचे जोरदार स्वागत झाले. मात्र या स्वागतदरम्यान राहुल गांधी यांना ‘व्हॅलेंटाईन डे’ला एक गिफ्ट मिळाले आहे. राहुल गांधींना एका महिलेने ‘किस’ केलं आहे.

नेमके काय घडले?

राहुल गांधी हे गुजरातमधील वलसाडच्या दौऱ्यावर असताना काही महिला कार्यकर्त्यांनी स्टेजवर येत त्यांचे सावगत केले. मात्र यादरम्यान त्यांना एका अनपेक्षित प्रसंगाला सामोरे जावे लागले आहे. एका महिला कार्यकर्तीने चक्क राहुल गांधी यांना किस केले. या अनपेक्षित प्रकरामुळे राहुल गांधी देखील काही क्षण गोंधळून गेले. तसेच भर स्टेजवर घडलेला हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाल्याने त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.

- Advertisement -

दरम्यान, काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. राहुल गांधी प्रसारमाध्यमांपासून जनसभांपर्यंत सगळीकडे त्यांनी मोदी आणि भाजपाविरोधात रान उठवत आहेत. ‘भाजपा आणि संघ द्वेष पसरवतो. मात्र आम्ही प्रेमच पसरवतो. मोदी शिव्या देतात’, असे राहुल गांधी अजमेर येथे सेवादलला संबोधिक करताना म्हणाले.

- Advertisement -

पहा – Video : अमरावतीत राष्ट्रीय कृषी परिषदेत ‘लावणी’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -