Video : मास्क न घालतलेल्या महिलेला एक हंसाने चांगलीच शिक्षा केलीये, कशी ते तुम्हीच बघा!

जगभरात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. लॉकडाऊन हळूहळू उठत असता तरी मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंग बाळगणं गरजेच आहे. पण हे नियम असूनही अनेकदा नागरिक सोशल डिस्टन्सिंगच पालन करत नाहीत. अनेकदा नागरिक मास्क गळ्यातच अडकवून फिरताना दिसतात. पण कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून मास्क घालणं कसं गरजेचं आहे याचं महत्त्व माणसांपेक्षा प्राण्यांना समजल्याच या व्हिडिओमधून दिसतं.

एका पार्कमध्ये एक महिला मास्क तोंडावर न लावता गळ्यात अडकवून हंसाबरोबर खेळायला गेली. हंसानं मात्र या महिलेला मास्क न लावल्यामुळे चांगलीच अद्दल घडवली आहे. या महिलेला मास्क योग्य पद्धतीनं न घातल्याचा धडा मिळाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

गेले काही दिवस मास्क वापरणं आणि सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे प्राण्यांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. इतकच नाही तर कोरोना होऊ नये म्हणून काही जणांनी प्राण्यांनाही मास्क लावल्याचं आपण बघितलं आहे. अशा परिस्थिती प्राणी जागृक असतात, जे प्राणांना कळतं ते माणसांना कळत नाही. असचं म्हणावं लागेल.

IFS सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत  हजारो लोकांनी पाहिला आहे.


हे ही वाचा – कंगना आणि माझी लढाई सुशांतसाठीच, अध्ययन सुमनचा यू टर्न!