घरदेश-विदेशकालिमातेच्या पूजेसाठी महिलांना बंदी

कालिमातेच्या पूजेसाठी महिलांना बंदी

Subscribe

महिलांना प्रवेश दिला तर काहीतरी दुर्घटना घडण्याची शक्यता भाविकांकडून वर्तवली जाते.

शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेश बंदीवर समाजाच्या विविध भागांतून संतप्त प्रतिक्रिया येत असतानाच आता कोलकातामध्येही असाच धक्कादायक प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे. कोलकाताच्या एका मंडपामध्ये महिलांना कालिमातेची पूजा करण्यास मनाई आहे. ही प्रथा गेल्या ३४ वर्षांपासून सुरु आहे. केरळमध्ये शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश द्या, असे आदेश सर्वौच्च न्यायालयाने दिले आहेत. परंतु, तरीही भक्तांच्या आंदोलनामुळे महिलांना अजूनही शबरीमाला मंदिरात प्रवेश मिळालेला नाही. याच पार्श्वभूमीवर कोलकातामधील कालिमातेच्या मंडपाकडेही पाहिले जात आहे. तिथेही महिलांना प्रवेश द्या, असा सूर काही लोकांनी लावला आहे. त्यामुळे कोलकातामध्येही कालिका मातेच्या दर्शनावरुन नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश नाहीच; नव्या वादाला सुरुवात

- Advertisement -

महिलांना प्रवेश दिला तर दुर्घटना घडल्याची शक्यता?

दरवर्षी कोलकातामध्ये चेतला प्रदीप संघाकडून बीरभूर जिल्ह्यात कालिमाता बसवण्यात येते. या कालिमातेचे पूजन गेल्या ३४ वर्षांपासून पूजारी करतात. येथे महिलांना दर्शनासाठी अनुमती दिली जात नाही. याविषयी संघाचे सहसचिव सैबल गुहा म्हणाले की, आमच्या मंडपात देवीदर्शनासाठी महिलांना येऊ दिले तर वस्तीमध्ये काही न काही दुर्घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे आम्ही महिलांना प्रवेश दिला जात नाही. कालिमातेच्या पूजेसाठी लागणारा प्रसादही चेतला प्रदिप संघाचे पुरुष कार्यकर्ते बनवतात. मुंर्तीचे पावित्र्य टिकून राहावे याची संपूर्ण काळजी याठिकाणी घेतली जाते. परंतु, धर्मशास्त्रात याविषयी कुठेही नोंद नसल्याचे इतिहासकार नृसिंहप्रसाद भादुरी म्हणाले आहेत.

हेही वाचा – ‘आता ४१ वर्षांनीच मी मंदिरात येणार’

- Advertisement -

गावातील महिलांकडून आक्षेप नाही

या अंधश्रद्धेविरोधात गावातील महिला कुठल्याही प्रकारे आक्षेप घेत नाही. ही आमची श्रद्धा आणि परंपरा असल्याचे म्हणत ते या विषयावर काहीच बोलत नाहीत.


हेही वाचा – का दिला जात नव्हता शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -