घरताज्या घडामोडीतब्बल २७ हजार किलोचा जगातील सर्वात लांब 'केक'

तब्बल २७ हजार किलोचा जगातील सर्वात लांब ‘केक’

Subscribe

जगातील सर्वात लांब केक बनवण्याचा विश्वविक्रम केरळमध्ये करण्यात आला असून तब्बल ६.५ किलोमीटर लांबीचा हा केक १५०० पेक्षा अधिक बेकर आणि शेफनी बनवला आहे.

जगातील सर्वात लांब केक बनवण्याचा विश्वविक्रम केरळमध्ये करण्यात आला आहे. तब्बल ६.५ किलोमीटर लांबीचा हा केक १५०० पेक्षा अधिक बेकर आणि शेफनी बनवला आहे. विशेष बाब म्हणजे हा केके व्हेनिला फ्लेवरचा असून याचे वजन तब्बल २७ हजार किलोग्रॅम इतके आहे. तसेच या केकची जाडी चार इंच इतकी असून हजारो टेबल जोडून त्यावर हा केक बनवण्यात आला. यावेळी बेकर आणि शेफ यांनी आपले कौशल्य पणाला लावत हा ‘व्हेनिला केक’ तयार केला आहे.

केक बनवण्यासाठी लागले ४ तास

सर्वात लांब ‘केक’ बनवण्यासाठी सुमारे चार तास लागले आहेत. तसेच हा केक बनवण्याकरता सुमारे १२ हजार साखर आणि पिठाचा यासाठी वापर करण्यात आला आहे. हा केक बनवण्याची प्रक्रिया पाहण्यासाठी हजारो लोकांनी गर्दी केली होती. हा केक ‘बेकर्स असोसिएशन केरळ (बेक)’ कडून बनवण्यात आला आहे.

- Advertisement -

गिनिज बुकच्या प्रतिनिधींनी या केकची लांबी मोजली असून लवकरच त्यांच्याकडून विक्रमाचे प्रमाणपत्र मिळेल. विशेष म्हणजे हा केक चीनमधील सर्वाधिक लांबीच्या केकचा विक्रम मोडणार आहे. २०१८ मध्ये चीनमध्ये ३.२ किलोमीटर लांबीचा फ्रूटकेक बनवण्यात आला होता. आता आम्ही आमचे कौशल्य दाखवले आहे. हा केक बनवत असताना त्याचा स्वाद, दर्जा आणि स्वच्छतेचीही पुरेपुर काळजी घेण्यात आली आहे.  – नौशाद, बेकेचे सचिव


हेही वाचा – अरेच्चा! लग्नानंतर समजले वधू ‘ती’ नसून ‘तो’ आहे!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -