घरCORONA UPDATECorona: कोरोनाची खोटी आकडेवारी देणाऱ्या देशांना WHO चा इशारा

Corona: कोरोनाची खोटी आकडेवारी देणाऱ्या देशांना WHO चा इशारा

Subscribe

जगभरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. या सर्व आकडेवारीवर जागतिक आरोग्य संघटना लक्ष ठेवून आहेत. यासंबंधी माहिती देण्यासाठी संघटनेचे संचालक माईक रेयान यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत कोरोनाबाधित देशांना इशारा दिला आहे. जो देश कोरोनाची खोटी आकडेवारी देईल, त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे त्यांनी यावेळी म्हटले. ते पुढे म्हणाले की, सर्व देश कोरोनाच्या आकडेवारीला गांभिऱ्याने घेताना दिसत नाहीत. आर्थिक संकटामुळे अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली असली तरी त्यामुळे लोकांमध्ये संपर्क वाढून कोरोनाचा संसर्गही मोठ्या प्रमाणात होत आहे.

हेही वाचा – उपसमितीने घेतला मराठा आरक्षणाच्या सुनावणीच्या तयारीचा आढावा

- Advertisement -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कित्येक महिन्यापासून देशांमध्ये लॉकडाऊन आहे. मात्र आता काही देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण कमी होत असून तेथील जनजीवन पूर्ववत आणण्यास सुरूवात झाली आहे. मात्र जिथे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यांनी पुन्हा एकदा लॉकडाऊनचा निर्णय घेणे अपेक्षित आहे, असेही माईक रेयान म्हणाले.

राज्यात मागील २४ तासांत सर्वाधिक ६ हजार ३६४ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून १९८ मृतांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ९२ हजार ९९० वर पोहोचला असून मृतांचा आकडा ८ हजार ३७६ झाला आहे. तसेच मागील २४ तासांत ३ हजार ५१५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत १ लाख ४ हजार ६८७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ५४.२४ टक्के एवढा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -