घरदेश-विदेशचिंतेत आणखी वाढ! 'या' देशात कोरोना व्हायरसचं रूप बदललं; WHO अलर्टवर!

चिंतेत आणखी वाढ! ‘या’ देशात कोरोना व्हायरसचं रूप बदललं; WHO अलर्टवर!

Subscribe

जागतिक आरोग्य संघटनेने हाय अलर्ट जारी केला असून WHO ने असे मान्य केले की कोरोना व्हायरसमध्ये म्यूटेशन होत आहे.

कोरोना व्हायरसचा प्रकोप थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. जगभरात कोरोना रुग्णांची संख्या आता पाच कोटींच्यावर पोहोचली आहे. रोज जगभरात पाच लाखांच्या आसपास कोरोना रुग्ण समोर येत आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे जगभरात १२ लाख ६१ हजार बळी गेले आहेत. मागील २४ तासात ४.६९ लाख नवीन कोरोना केसेस समोर आल्या आहेत. अशा परिस्थितीत डेन्मार्कमध्ये वेगळ्या प्रकारच्या SARS-CoV-2 कोरोनाव्हायरसची २१४ प्रकरणं आढळून आली आहे. यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने हाय अलर्ट जारी केला असून WHO ने असे मान्य केले की कोरोना व्हायरसमध्ये म्यूटेशन होत आहे.

५ नोव्हेंबर रोजी डेन्मार्कमध्ये सापडलेल्या या नव्या प्रकरणांमध्ये एक खास प्रकारचा कोरोना स्ट्रेन आढळून आला असल्याची माहिती मिळतेय. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामधील बदलांमुळे डेनिश सरकार एक कोटी ७० लाख उंदीर मारण्याचा विचार केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की उंदीर नवीन SARS-CoV-2 साठी कारणीभूत ठरू शकतात.

- Advertisement -

असे सांगितले जात आहे की, हा व्हायरस चीनमध्ये कोरोना संक्रमित उंदरांपासून मनुष्यांमध्ये संक्रमित झाला होता. तर आम्हाला डेन्मार्कमध्ये उंदीरांपासून कोरोनो व्हायरसची लागण झालेले अनेक लोक आढळले आहेत ज्यांच्यात कोरेना व्हायरसमध्ये काही अनुवांशिक बदल दिसले. त्यामुळे डॅनिश अधिकारी या निष्कर्षांच्या व्हायरलॉजिकल तपासण्या करत असल्याची माहिती जिनिव्हामध्ये WHOच्या एका अधिकाऱ्याने दिली.

वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगभरात आतापर्यंत ५ कोटी ७ लाख लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आतापर्यंत ३  कोटी ५७ लाख रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे जगभरात १२ लाख ६१ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरात कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता १ कोटी ३६ लाखांवर पोहोचली आहे.


US Election 2020: पती डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाल्यानंतर पत्नीचा सल्ला; म्हणाली…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -