जगातील सगळ्यात स्थूल माणसाने केले वजन कमी

वजन वाढल्यामुळे जुआन हलू शकत नव्हता. त्यामुळे चालणे तर दूरच! या वेट लॉस सर्जरीनंतर त्याने ३०० किलो वजन कमी केले. त्यामुळे आता जुआन चालू शकतो..

Mexico
juan_pedro
जगातील सगळ्यात स्थूल माणूस ज्युआमन पेड्रो सर्जरीला जाताना (सौजन्य- डेली मेल)

जगातील सगळ्यात स्थूल माणसाचे वजन तब्बल ५९५ किलो आहे. या वजनामुळे त्याची नोंद गिनीज बुकात करण्यात आली होती. पण आता जगातील सर्वात स्थूल माणूस म्हणून त्याला यापुढे ओळखले जाणार नाही. कारण या माणसाने चक्क ३०० किलो वजन घटवले आहे. जुआन पेड्रो फ्रॅन्को (३४) असे या माणसाचे नाव असून तो मेक्सिकोचा आहे. ज्याने वेट- लॉस सर्जरीच्या माध्यमातून हे त्याने हे वजन कमी केले आहे. त्यामुळेच आता तो जगातील सगळ्यात स्थूल आणि वजनदार माणसू राहिला नाही.

वाचा- स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी रेकॉर्डब्रेक गर्दी

दोन वर्षांपूर्वी सोडले घर

जुआनचे वजन गेल्या कित्येक वर्षांपासून सातत्याने वाढत आहे. प्रत्येक वर्षाला त्याच्या वजनात ९ किलोने वाढ होत होती. त्यामुळे त्याची प्रकृती ढासळत चालली होती. पण दोन वर्षांपूर्वी जुआनने त्याचे घर वजन कमी करण्यासाठी सोडले आणि तो वजन कमी करण्यासाठी विशेष क्लिनिकमध्ये अॅडमिट झाला.

लहानपणापासूनच स्थूल

एका वेबपोर्टलने दिलेल्या माहितीनुसार जुआन सहा वर्षांचा होता त्यावेळी त्याचे वजन ६० किलो होते. जो ज्या आजारासह जन्माला आला त्यामुळे त्याचे वजन सातत्याने वाढत असल्याचे त्याने सांगितले. त्यातच वयाच्या १७ व्या वर्षी त्याचा अपघात झाला आणि त्यानंतर त्याचे वजन वाढतच गेले.

आता तो चालू शकतो

वजन वाढल्यामुळे जुआन हलू शकत नव्हता. त्यामुळे चालणे तर दूरच! या वेट लॉस सर्जरीनंतर त्याने ३०० किलो वजन कमी केले. त्यामुळे आता जुआन चालू शकतो,अशी माहिती त्याने मेक्सिकोतील वर्तमानपत्रांना दिली आहे. शिवाय तो आणखी १३८ किलो वजम कमी करणार असे देखील त्याने सांगितले आहे.