जगभरात कोरोनाची सद्यस्थिती : ७ लाख कोरोनाबाधित तर बळींची संख्या घाबरवणारी

जगभरात कोरोनाची सद्यस्थिती भयंकर असल्याचे दिसून आले आहे.

Mumbai
worldwide number of victims is 33 thousand

जगभरात कोरोनाने अक्षरश: थैमान घातले आहे. रोज हजारो लोकांना कोरोनाची लागण होताना दिसत आहे. तर शेकडो लोकांची मृत्यू होत आहे. कोरोना व्हायरसमुळे गेल्या काही दिवसातील जगभरातील मृतांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास हा व्हायरस अतिशय भयंकर असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत जगभरात ७ लाख कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामध्ये मृतांची संख्या ऐकून धक्काच बसेल. मृतांनी तर ३१ हजारचा आकडा पार केला आहे.

जगभरात मृत्यूची संख्या

जगभरात कोरोना विषाणूमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या रविवारपर्यंत ३१ हजार ४१२ इतकी होती. हा आकडा २४ तासात वाढला असून सद्यस्थितीनुसार जगभरात ३३ हजार ९७६ जणांचा मृत्यू झाला आहे. २४ तासाच ही संख्या २ हजार ५६४ ने वाढली आहे.

कोरोनाबाधितांची संख्या

आतापर्यंत जगात ७ लाख २२ हजार १९६ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ही आकडेवारी पाहून अनेकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे.

कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या

जगभरात कोरोनाची लागण होऊन अनेक जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत १ लाख ५१ हजार ७६६ लोक करोनामुक्त झाले आहे.

इटलीतील १० हजार जणांचा मृत्यू

इटलीमध्ये आतापर्यंत १० हजार ७७९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून ९७ हजार ६८९ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर १३ हजार ३० लोक बरे झाले आहेत.

चीनमध्ये ७५ हजार लोक झाले बरे

चीनमध्ये आतापर्यंत ३ हजार ३०४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून ८१ हजार ४७० लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर ७५ हजार ७०० लोक बरे झाले आहेत.

अमेरिकेत सर्वात अधिक लागण

अमेरिकेमध्ये आतापर्यंत २ हजार ४८४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून १ लाख ४२ हजार १७८ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर ४ हजार ५५९ लोक बरे झाले आहेत.

स्पेनमध्ये ८० हजार लोकांना लागण

स्पेनमध्ये आतापर्यंत ६ हजार ८०३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून ८० हजार ११० लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर १४ हजार ७०९ लोक बरे झाले आहेत.

जर्मनीतील संख्या

जर्मनीमध्ये आतापर्यंत ५४१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून ६२ हजार ४३५ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर ९ हजार २११ लोक बरे झाले आहेत.

फ्रान्समधील संख्या

फ्रान्समध्ये आतापर्यंत २ हजार ६०६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून ४० हजार १७४ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर ७ हजार २०२ लोक बरे झाले आहेत.


हेही वाचा – Corona Live Update : पुण्यात अजून दोघे कोरोनाबाधित; दोघेही झोपडपट्टीतील रहिवासी!