घरदेश-विदेशदिल्लीची 'हवा जीवघेणी'

दिल्लीची ‘हवा जीवघेणी’

Subscribe

दिल्लीतील हवेची पातळी सध्या खालावली आहे. पंजाब, हरियाणामध्ये होणाऱ्या शेतीच्या कामांचा परिणाम हा दिल्लीच्या हवेवरती होत असतो.

सध्या दिल्लीकरांचा जीव घुटमळतोय. त्यासाठी कारणीभूत ठरली आहे ती दिल्लीची हवा. राजधानी दिल्लीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर प्रदुषण पाहायाला मिळतंय. आज ( मंगळवारी ) दिल्लीतील हवा या मोसमातील सर्वात प्रदुषित हवा म्हणून नोंदवली गेली. प्रदुषित हवेमुळं सध्या दिल्लीकरांना श्वास घेणं देखील अवघड झालं आहे. प्रदुषित हवेमुळं श्वसनाचे तसेच घशाचा त्रास देखील दिल्लीकरांना होत आहे. ऑक्टोबर – नोव्हेंबर दरम्यान दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदुषण होतं. पंजाब, हरियाणा या राज्यातील शेतकरी शेतीच्या कामासाठी पाळापाचोळ्याची जाळपोळ करतात. त्याचा परिणाम हा हवेवरती होऊन दिल्लीची हवा प्रदुषित होते. परिणामी शेतकऱ्यांनी यावर वैज्ञानिक उपाय वापरावा असं देखील सध्या सुचवलं जात आहे. पण, संबंधित खर्च पेलावणारा नाही असं उत्तर शेतकऱ्यांकडून दिलं जात आहे. त्यामुळे शेतीचं काम पूर्ण होईपर्यंत दिल्लीकरांना मात्र प्रदुषित हवेचा सामना करावा लागणार हे नक्की!!

उपग्रहाच्या मदतीनं देखील दिल्लीच्या वातावरणासंर्भात काही फोटो घेण्यात आली आहेत. त्यामध्ये देखील दिल्लीच्या प्रदुषणाच्या पातळीचा अंदाज येतो. प्रदुषणामुळं घराबाहेर पडणं देखील नकोसं झालं आहे. अनेक वेळा मास्क लावून घराबाहेर पडणे दिल्लीकर पसंत करतात. दरम्यान, प्रदुषणाचं हे प्रमाणं आणखी काही दिवस तरी कायम राहण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

वाचा – या कारणास्तव दिल्लीमध्ये वाढते प्रदुषण

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -