घरताज्या घडामोडीYes Bank प्रकरणी ED ने राणा कपूर यांची २२०० कोटींची मालमत्ता केली...

Yes Bank प्रकरणी ED ने राणा कपूर यांची २२०० कोटींची मालमत्ता केली जप्त!

Subscribe

मुंबईच्या उच्चभ्रू वस्तीत पेडर रोडवरचे ६ प्रशस्त फ्लॅट्स आणि मलबार हिलचा आलिशान बंगला याचा समावेश आहे.

येस बँक  घोटाळा प्रकरणी अखेर सक्तवसुली संचालनालस (ED)ने बँकेचे सहसंस्थापक आणि आरोपी राणा कपूर यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. राणा कपूर आणि कुटुंबीयांच्या मालकीची तब्बल २२०० कोटींची मालमत्ता जप्त करण्यात येणार आहे. DHFL चे प्रमोटर कपिल आणि धीरज वाधवान यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे. त्यांची संपत्तीही जप्त करण्यात येणार आहे.

दरम्यान येस बँकेच्या राणा कपूरच्या मालकीची मुंबई, पुण्यासह अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि यूकेमध्ये असणारी मालमत्ता जप्त होणार आहे. यामध्ये मुंबईच्या उच्चभ्रू वस्तीत पेडर रोडवरचे ६ प्रशस्त फ्लॅट्स आणि मलबार हिलचा आलिशान बंगला याचा समावेश आहे. लंडनमध्येही राणा कपूर यांची मोठी मालमत्ता होती. त्यावरही टाच आली आहे. दुसऱ्या एका आर्थिक घोट्याळ्याच्या केसमध्ये वाधवान बंधू आधीच CBI च्या ताब्यात आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे.

- Advertisement -

येस बँकेचे राणा कपूर आणि त्यांच्या दोन मुलींची डमी कंपनी अर्बन बँक व्हेन्चर्स या घोटाळ्यांमधून ६०० कोटी रुपये मिळाले होते, याची ईडी चौकशी करीत आहे. ३० हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम कर्ज म्हणून बेकायदेशीरपणे मंजूर केल्याचा राणा कपूर यांच्यावर आरोप आहे. येस बँकेनं डीएचएफएलला ३,७५० कोटी रुपये आणि डीएचएफएलच्या नियंत्रणाखाली असलेल्या आरकेडब्ल्यू डेव्हलपर्सना ७५० कोटींचे कर्ज दिलं आहे.


हे ही वाचा – सुशांतच्या आत्महत्येनंतर अंकिताच्या बॉयफ्रेंडने घेतला ‘हा’ निर्णय!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -