Tuesday, January 12, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश कोरोना लसीमुळे नपुंसकही होऊ शकता; सपा आमदाराचं अजब विधान

कोरोना लसीमुळे नपुंसकही होऊ शकता; सपा आमदाराचं अजब विधान

Related Story

- Advertisement -

कोरोनावर मात करण्यासाठी देशभरातील लोक लसीची प्रतिक्षा करत असताना दुसरीकडे समाजवादी पक्षाचे नेते लसीबाबत वादग्रस्त विधानं करत आहेत. शनिवारी सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी आम्ही भाजपच्या लसीवर विश्वास ठेवू शकत नाही नाही, असं विधान केलं होतं. दरम्यान, त्यांच्यापाठोपाठ त्यांच्या पक्षाच्या आमदाराने देखील कोरोना लसीबाबत अजब विधान केलं आहे. कोरोना लसीमुळे नपुंसकही होऊ शकता, काहीही होऊ शकतं असं विधान सपाचे आमदार आशुतोष सिन्हा यांनी केलं आहे.

“कोरोना लसीमध्ये काहीतरी असं असू शकतं, ज्यामुळे नुकसान होईल. उद्या लोकं म्हणतील वॅक्सीन लोकसंख्या कमी करण्यासाठी/मारण्यासाठी दिलं गेलं आहे. तुम्ही नपुंसक देखील होऊ शकता. काहीपण होऊ शकतं.” असं खळबळजनक विधान समाजवादी पार्टीचे मिर्झापूरचे आमदार आशुतोष सिन्हा यांनी केलं आहे.

- Advertisement -

अखिलेश यादव यांनी शनिवारी २ जानेवारीला कोरोना लसीसंदर्भात विधान केलं होतं. “मी सध्या लसीकरण करून घेणार नाही. भाजपच्या लसीवर मी कसा काय विश्वास ठेवू? जेव्हा आमचं सरकार तयार होईल तेव्हा प्रत्येकाला मोफत लस मिळेल. आम्ही भाजपची लस घेऊ शकत नाही,” असं अखिलेश यादव यांनी म्हटलं.

- Advertisement -

 

- Advertisement -