घरदेश-विदेशभारतात 'या' राशीचे व्यक्ती आहेत जास्त श्रीमंत

भारतात ‘या’ राशीचे व्यक्ती आहेत जास्त श्रीमंत

Subscribe

मग काय? तुमची रास कुठली आहे हे शोधताय ना!

फोर्ब्सने नुकतीच भारतातील श्रीमंत लोकांच्या यादी प्रसिद्ध केली आहे. या श्रीमंतांबाबत एक प्रचलित विचार आहे. तो म्हणजे हे श्रीमंत नशीब घेऊन जन्माला येतात. कष्ट काय कोणीही करते. पण नशीबात नसेल तर श्रीमंती मिळत नाही, असे म्हटले जाते. त्यामुळे या श्रीमंतांचे नशीब काय असेल हे जाणून घ्यायला सर्वच उत्सुक असतात. चला तर मग! या श्रीमंतांची रास काय हे जाणून घेऊ या.

कर्क

- Advertisement -

भारतातील श्रीमंतांच्या यादीत सर्वाधिक श्रीमंत हे कर्क राशीचे आहेत. या यादीत कर्क राशीवाल्यांचे एकूण प्रमाण ११.२ टक्के आहे. त्यापैकी सर्वात श्रीमंत गौतम अदानी आहेत. त्यांची संपत्ती ही ९४,५०० कोटी रुपये इतकी आहे.

कन्या

- Advertisement -

त्या खालोखाल श्रीमंतांच्या यादीत कन्या राशीच्या श्रीमंतांची संख्या येते. या यादीत एकूण १०.५ टक्के कन्या राशीचे श्रीमंत आहेत. त्यांच्यापैकी शापूर पालनजी मिस्त्री हे कन्या राशीचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. कन्या राशीच्या शापूर पालनजी मिस्त्री यांची संपत्ती ७६,८०० कोटी रुपये इतकी आहे.

मेष

भारतातील गर्भ श्रीमंतांच्या यादीत मेष राशीवाल्या श्रीमंतांची संख्याही भरीव आहे. या यादीत ९.२ टक्के श्रीमंत हे मेष राशीतील आहेत. त्यांपैकी रिलायन्स कंपनीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे सर्वात श्रीमंत आहेत. त्यांची संपत्ती ३ लाख ८० हजार ७०० कोटी रुपयांची आहे.

सिंह

श्रीमंतांच्या यादीत सिंह राशीच्या श्रीमंतांची संख्या ८.९ टक्के इतकी आहे. सिंह राशीच्या श्रीमंतांमध्ये सर्वाधिक श्रीमंत अझीझ प्रेमजी आहेत. त्यांची एकूण संपत्त १ लाख १७ हजार १०० कोटी रुपये आहे.

वृश्चिक

यादीत वृश्चिक राशीच्या श्रीमंतांचे प्रमाण ८.५ टक्के इतके आहे. त्यांच्यापैकी सर्वात श्रीमंत व्यक्ती युसुफ अली मा हे आहेत. त्यांची एकूण संपत्ती ३५,७०० कोटी रुपये इतकी आहे.

मिथुन

मिथुन राशींच्या श्रीमंतांची संख्याही लक्षणीय आहे. यादीत तब्बल ८.३ टक्के श्रीमंत हे मिथुन राशीचे आहेत. त्यांच्यापैकी सर्वाधिक श्रीमंत हे एल एन मित्तल आहेत. त्यांची एकूण संपत्ती १ लाख ७ हजार ३०० कोटी रुपयांची आहे.

मकर

मकर राशीच्या गर्भश्रीमंतांची संख्याही काही कमी नाही. श्रीमंतांच्या यादीत तब्बल ८.३ टक्के श्रीमंत हे मकर राशीचे आहेत. त्यापैकी स्मिता कृष्णा या सर्वाधिक श्रीमंत आहेत. त्यांची संपत्ती ३१,४०० कोटी रुपयांची आहे.

मीन

श्रीमंतांच्या यादीत मीन राशीचे श्रीमंत तब्बल ८.१ टक्के आहेत. त्यांच्यापैकी सर्वाधिक श्रीमंत उदय कोटक आहेत. त्यांची एकूण संपत्ती ९४,१०० कोटी रुपयांची आहे.

तुळा

तुळा राशीचे लोक समतोल असतात. ते सारासार विचार करून कृती करतात. त्यांची संख्याही श्रीमंतांच्या यादीत भरीव आहे. भारतातील गर्भश्रीमंतांच्या यादीत तब्बल ८ टक्के श्रीमंत हे तुळा राशीचे आहेत. दिलीप संघवी हे त्यापैकी सर्वाधिक श्रीमंत असून त्यांची संपत्ती ७१,५०० कोटी रुपयांची आहे.

वृषभ

वृषभ राशीचे लोक कष्टाळू असतात. त्यामुळे श्रीमंत होण्यासाठी ते खूप कष्ट उपसतात. अशा वृषभ राशींच्या श्रीमंतांची संख्या भारताच्या श्रीमंतांच्या यादीत फार नसली तरी ६.४ टक्के आहे. सायरस पुनावाला हे त्यांपैकी सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची संपत्ती ८८,८९९ कोटी रुपयांची आहे.

धनु

धनु राशीचे श्रीमंत, श्रीमंतांच्या यादीत तब्बल ६ टक्के आहेत. त्यांच्यापैकी एसपी हिंदुजा हे मोठे नाव. ते या राशीच्या श्रीमंतांमध्ये सर्वाधिक श्रीमंत आहेत. त्यांची संपत्ती १,८६,५०० कोटी रुपये आहे.

कुंभ

कुंभ राशीचे लोक गर्भश्रीमंतांच्या यादीत ६.३ टक्के आहेत. त्यांच्यापैकी नुसली वाडीया हे सर्वाधिक श्रीमंत असून त्यांची संपत्ती तब्बल ४२,४०० कोटी रुपयांची आहे.

मग काय? तुमची रास कुठली आहे हे शोधताय ना! तुम्ही कर्क राशीचे असाल तर तुम्ही गर्भश्रीमंत होण्याचे चान्स जास्त आहेत. पण कुंभ राशीचे असलात तरीही तुम्हाला संधीही आहेच. मात्र त्यासाठी प्रामाणिक कष्ट, योग्य संधीचे सोने करणे, नवीन संकल्पना आणि आऊट ऑफ बॉक्स विचार करणे आणि सद्विवेक बुद्धीने वागणे आवश्यक आहे. राशी, भविष्य तुम्हाला साथ देतीलच पण त्यासाठी सकारात्मक विचार हा महत्त्वाचा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -