घरदेश-विदेश'अंत्यसंस्काराला माझ्या प्रेयसीला बोलवा'; आत्महत्येपूर्वी तरुणाचा मित्राला निरोप

‘अंत्यसंस्काराला माझ्या प्रेयसीला बोलवा’; आत्महत्येपूर्वी तरुणाचा मित्राला निरोप

Subscribe

‘खुप प्रयत्न केल्यानंतरही प्रेयसीने दिलेले दुःख विसरणे मला शक्य होत नाही आहे. तिच्या मित्रांनी मला आत्महत्या करण्यास भाग पाडले आहे. मी आत्महत्या करत आहे. माझ्या मृत्यूची बातमी आणि माझा शेवटचा फोटो फेसबुकवर अपलोड करा. माझ्या अंत्यसंस्काराला माझ्या प्रेयसीला बोलवा’, असा मेसेज धक्कादायक मेसेज मित्राला देऊन त्याने जगाचा निरोप घेतला. हरप्रीत नावाच्या तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी ही चिठ्ठी लिहून आणि व्हिडिओ तयार करून आपली व्यथा मांडली त्यानंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हरप्रीतने या आत्महत्येसाठी आपली प्रेयसी आणि दोन मित्र कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर संबंधीत तरुणीविरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

हरप्रित सिंह असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव असून तो आपल्या कुटुंबियांसह दिल्लीतील निहाल विहार परिसरात राहत होता. अपघातात जखमी झाल्याने तो गेले काही दिवसतो घरी आराम करत होता. मंगळवारी, १२ नोव्हेंबर रोजी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पोलिसांना त्याच्या खोलीतून ही चिठ्ठी मिळाली. ज्यामध्ये त्याने आपल्या मृत्यूसाठी प्रेयसी आणि दोन मित्रांना जबाबदार ठरवले. मी माझ्या प्रेयसीला ७ लाख रुपये व्याजावर दिले होते. मात्र ते पैसे परत देण्यास सांगितल्यावर तिने मित्रांसोबत मिळून मला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली होती, असे हरप्रीतने या चिठ्ठीत म्हटले आहे.

- Advertisement -

दरम्यान, पोलिसांना तपासात मोबाईलमध्ये एक व्हिडिओ सापडला असून हा व्हिडिओ हरप्रीतने आत्महत्या करण्यापूर्वी तयार केला होता. हरप्रीत याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. याबाबत हरप्रीतच्या भावाने सांगितले की, हरप्रीत हा कंपनीत काम करणाऱ्या एका तरुणीवर प्रेम करत होता. तिच्यासोबत लग्न करण्याची त्याची इच्छा होती. काही दिवसांपूर्वी आमचे नातेवाईक बोलणी करण्यासाठी या तरुणीच्या घरी गेले होते. मात्र तरुणीने आणि तिच्या कुटुंबियांनी लग्नाला करण्यास नकार दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -