तरुणाला सापासोबत मस्ती करणं पडलं महागात!

younster died snake bite shop sitapur uttar pradesh
तरुणाला सापासोबत मस्ती करणं पडलं महागात!

हुशारी करत जोशात असलेल्या एका तरुणाला सापाशी मस्ती करणे महागात पडले आहे. दुकानात आढळलेल्या सापाला हातात पकडून तरुण मस्ती करत होता. त्यावेळेस त्या विषारी सापाने चावल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशमधील सीतापूर जिल्ह्यातील घडली आहे.

त्या विषारी सापासोबत मस्ती करत असताना तरुणाचा व्हिडिओ तेथे उपस्थित असलेल्या एका व्यक्ती आपल्या मोबाईलमध्ये केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही घटना चर्चेत आली. तालगाव परिसरातील कसरेला तिराहे मधील ही घटना आहे. मृत झालेल्या तरुण सीतापूरमधील आदर्श नगर येथील रहिवासी होता.

नक्की काय घडले?

आदर्श नगर येथील रहिवासी मृत तरुणाचे नाव सौरश असे होते. तो काम करण्यासाठी कसरेला गेला होता. तिथे एका दुकानात साप आढळला. तेव्हा सौरभने त्या विषारी सापाला हातात पकडले. सापाने सौरभच्या हाताला विळखा घातला. नंतर स्वतःला धोका असल्याचे पाहून साप सौरभला चावला. या घटनेदरम्यान तिथे असलेल्या लोकांनी सौरभला सापाला सोडण्याची विनंती केली आणि त्यावेळेस सापाने हातातून जाण्याचा प्रयत्नही केला. पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता.

सौरभला सापाने चावल्यानंतर तातडीने जिल्हाय रुग्णालयात आणले गेले. परंतु रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.


हेही वाचा – बापरे! इस्लामपूरमध्ये कोरोनाबाधित रुग्णाच्या मृतदेहाचे भटक्या कुत्र्यांनी तोडले लचके