Tuesday, January 12, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश भयंकर! गर्लफ्रेंडला मोबाईल देण्यासाठी बॉयफ्रेंडने केली मित्राची हत्या

भयंकर! गर्लफ्रेंडला मोबाईल देण्यासाठी बॉयफ्रेंडने केली मित्राची हत्या

बॉयफ्रेंडसह त्याच्या साथीदारांनी गळा अवळून केली हत्या

Related Story

- Advertisement -

उत्तरप्रदेशातील आग्रा जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका तरूणाने आपल्या गर्लफ्रेंडला मोबाईल देण्यासाठी चक्क बॉयफ्रेंडने आपल्या मित्राचीच हत्या केली. या हत्येत सहभागी असणाऱ्या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आले असून ही एक ब्लाइंड केस असल्याने मारेकऱ्यांना ताब्यात घेणं आव्हानात्मक आहे, असे पोलिसांकडून सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आग्र्यातील सैया भागातील आहे. या भागात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह ६ जानेवारी रोजी आढळला होता. या प्रकरणासंदर्भात पोलिसांनी तपास केल्यानंतर त्या व्यक्तीची ओळख पटली. त्याचे नाव जितेंद्र असून त्याची हत्या त्याच्याच मित्राने मोनूने केली असल्याचे सांगितले जात आहे.

असा घडला प्रकार

मोनूच्या गर्लफ्रेंडने तिला मोबाईल हवा असा सारखा तगादा लावला होता. मात्र मोनूकडे नोकरी, रोजगार नसल्याने तो बेरोजगार होता. त्यामुळे तो आपल्या गर्लफ्रेंडला मोबाईल देऊन तिचा हट्ट पूर्ण करू शकला नाही. त्यामुळे आरोपी मोनूने गर्लफ्रेंडला मोबाईल मिळवून देण्याचे नियोजन आखले आणि त्यानुसार त्याने ते नियोजन पूर्ण केले. दरम्यान मोनूचा मित्र जितेंद्रकडे स्मार्टफोन होता. तोच फोन मोनूला जितेंद्रचा मोबाईल घ्यायचा होता. हा मोबाईल मिळवण्यासाठी मोनूने आणखी एकाला मदतीला घेतले. त्यानंतर जितेंद्रला एका ठिकाणी घेऊन गेले. या दोघांनी त्याचा गळा आवळून त्याची हत्या केली. त्याचे प्राण वाचू नये म्हणून मृत व्यक्तीच्या नाका-तोंडात माती देखील टाकली.

- Advertisement -

असे कृत्य केल्यानंतर जेव्हा जितेंद्र मृत झाल्याचे कन्फर्म झाले तेव्हा मोनूने त्याचा मोबाईल त्याच्याकडून घेतला आणि त्याने त्याच्या साथीदारासह पळ काढला. पोलिसांनी मोनूसह त्याच्या साथीदाराला अटक केले असल्याची माहिती मिळतेय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ जानेवारीला सैया परिसरात सरसोच्या शेतात तरूणाचा मृतदेह सापडला होता. हा मृतदेह जितेंद्र या तरूणाचाच होता. हा तरूण चमरपूर डांग घियावली धौलपूर येथे राहण्यास होता. सैया या ठिकाणी त्याच्या बहिणीच्या घरी तो आला होता. मात्र ५ जानेवारीला बहिणीच्या घरातून जसा तो निघाला तसा तो बेपत्ता झाला होता. बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी हरवल्याची तक्रार पोलिसात दाखल केली होती. या सर्व प्रकारानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

- Advertisement -