घरदेश-विदेशपार्टीला आली नाही म्हणून नातूने आजीची केली हत्या

पार्टीला आली नाही म्हणून नातूने आजीची केली हत्या

Subscribe

मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीला आजी आली नाही म्हणून एका २२ वर्षीय तरुणाने आपल्या आजीची हत्या केली आहे.

हरियाणा जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका नातूने आपल्या आजीचा लोखंडी रॉडने हत्या केली आहे. एका शुल्लक कारणासाठी या नातूने आपल्या आजीची हत्या केली. या आजीचं नाव रामदेवी असं होतं. त्या ७० वर्षांच्या होत्या. आजी आपल्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीला आली नाही म्हणून त्याने तिच्या सोबत हुज्जत घातली आणि तिची हत्या केली.

काय आहे नेमकं प्रकरण?

आजीची हत्या केलेल्या नातवाचे नाव विकी असं आहे. तो २२ वर्षांचा आहे. यासंदर्भात पोलिसांनी ‘इंडिया टुडे’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की, ‘या आजीला दोन मुलं आहेत. परंतु, संपत्तीच्या वादातून दोन्ही विभक्त राहायला लागले.’ विकीने शुक्रवारी मुलगा जन्माला आल्याबद्दल पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला त्याने आपल्या आजी-आजोबांनाही बोलावलं होतं. ही पार्टी चंदीगडला आयोजित करण्यात आली होती. परंतु, आजी-आजोबा फतेहबादला वास्तव्यास आहेत. वयोमानानुसार त्यांना चंदीगढला पार्टीला जाणे जमले नाही. याच गोष्टीचा राग विकीला आला. शुक्रवारी रात्री तो घरी आला आणि त्याने आपल्या आजीसोबत हुज्जत घालायला सुरुवात केली. रागावर ताबा न मिळवत त्याने आपल्या आजीच्या डोक्यात लोखंडी रॉड टाकला. त्यानंतर आजी रक्तबंबाळ झाल्या. त्यांना ताबोडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु. रुग्णालयात त्यांना मृत घोषित केलं.

- Advertisement -

विकी आणि त्याच्या आईला अटक

यासंदर्भात विकीच्या आजोबांनी पोलिसांना विकीच्या विरोधात कबूली जवाब दिला. या घटनेनंतर पोलिसांनी विकी, त्याची आई निर्मला आणि त्याचे वडील जय कुमार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी विकी आणि त्याची आई निर्मला यांना अटक केली आहे. त्याच्या वडीलांचा तपास पोलीस घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -