घरदेश-विदेश'प्रँक' व्हिडिओवर बंदी, YouTube चा फोल दावा

‘प्रँक’ व्हिडिओवर बंदी, YouTube चा फोल दावा

Subscribe

लोकांची दिशाभूल करणारे अनेक व्हिडिओ आजही युट्यूबवर असून, ते लवकरात लवकर बंद करण्याची मागणी देशभरातील लोकांकडून करण्यात येत आहे.

मुंबईच्या भोईवाडा परिसरात राहणाऱ्या श्रावणी घोलप या १५ वर्षीय मुलीने, यूट्युबवरील व्हिडिओ पाहून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली. यामुळे यूट्यूबवर सर्व स्तरातून टीकेची झोड उठली आहे. यूट्युबवरील अनेक व्हिडिओ हे अत्यंत धोकादायक आणि तरूणांसाठी घातक असल्याची टीका नेटिझन्स सोशल मीडियावरुन करत आहेत. तसंच यूट्युबवर ज्याप्रमाणे माहितीपूर्ण व्हिडिओ आहेत त्याप्रमाणे लोकांचे मन विचलित करणारे देखील व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणात आहेत. ज्याचा समाजावर विघातक किंवा चुकीचा परिणाम होत असून, लहान मुलांवर त्याचा विशेष दुष्परिणाम होत आहे, अशी टीका पालकवर्गातून केली जात आहे. मात्र, ‘कहानी में ट्वीस्ट’ म्हणजे अशाप्रकारचे ‘प्रँक’ असलेले तसंच धोकादायक व्हिडिओ आम्ही यापूर्वीच बॅन केल्याचा दावा, यूट्युबकडून करण्यात आला आहे.

वाचा : YouTube मुळे तरूणीची आत्महत्या

मात्र, यूट्यूबचा हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचं लोकांकडून म्हणण्यात येत आहे. यूट्युबने कितीही दावा ठोकला तरी आजही अशाप्रकारचे ‘प्रँक’ व्हिडिओ आणि लोकांची दिशाभूल करणारे व्हिडिओ यूट्युबवर अजूनही सुरु आहेत, असं लोकांचं म्हणणं आहे. ‘स्वर्ग का रस्ता’, ‘मृत्यू से बचने के १० तरीके’, ‘सुख मिळवण्याचे झटपट उपाय’ अशाप्रकारचे बिनकामाचे आणि लोकांची दिशाभूल करणारे व्हिडिओ आजही युट्यूबवर असून, ते लवकरात लवकर बंद करण्यात यावे, अशी मागणी देशभरातील लोकांकडून आणि पालकांकडून करण्यात येत आहे. याआधीही अनेकदा देशात यु-ट्युबवरील प्रँक व्हिडिओ चर्चेत आले होते.
भोईवाडा श्रावणी घोलपनेही युट्युबमुळे आत्महत्या केल्याचं पोलीस चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, थेट स्वर्गात कसे जाता येईल? याचे व्हिडिओ श्रावणी वारंवार यूट्यूबवर पाहायची. या व्हिडिओना फॉलो करुनच त्यातूनच तिने एक अघोरी प्रयोग अवलंबला आणि त्यामुळे तिचा दुर्देवी अंत झाला.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -