Sunday, November 15, 2020
27 C
Mumbai
घर इको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा

इको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा

इको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा,घरगुती गणपती सजावट,शाडूची मूर्ती,घरगुती मखर बनवा,गणपती सजावट टिप्स,इको फ्रेंडली मखर मिळेल, Decoration for Ganesh Festival,Eco Friendly Decoration,Home Ganesh Decoration,Home Ganpati Decoration Tips,Home Ganesh Decoration Ideas

माय महानगरच्या इको फ्रेंडली बाप्पा काँटेस्टमध्ये सहभागी होण्यासाठी खालील गोष्टींची पुर्तता करा...

श्री गणरायाचा उत्सव म्हणजे आपल्या सर्वांसाठीच आनंदाचा सोहळा! पर्यावरणाच्या संवर्धनासाठी अनेकजण इको फ्रेंडली गणोशोत्सव साजरा करतात. मात्र त्याची माहिती इतरांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळेच आम्ही घेऊन आलो आहोत ‘इको फ्रेंडली बाप्पा कॉन्टेस्ट’! या माध्यमातून तुम्हाला तुमची इको फ्रेंडली उत्सवाची संकल्पना इतरांनाही दाखवता येणार आहे. चला तर मग, प्रबोधनाचा हा वारसा आपण एकत्र पुढे नेऊया! इको – फ्रेंडली बाप्पा काँटेस्टमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्याला काही गोष्टींची पूर्तता करावी लागेल.

यासाठी खालील मुद्दे पाहा.

– शाडूची मूर्ती किंवा पीओपी (प्लास्टर ऑफ पॅरिस) नसलेली विघटनशील कोणतीही मूर्ती

– प्लास्टिक आणि थर्माकॉल विरहित सजावट

– विघटनशील किंवा नैसर्गिक फुलांचा देखावा

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी काय करावं?

– आमच्या 75066 50006 या व्हॉट्सअॅप नंबरवर किंवा [email protected] आयडीवर खालील माहिती पाठवा

– तुमचे नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक पाठवा

– बाप्पांच्या मूर्तीचा फोटो

– सजावट आणि देखाव्याचा फोटो

– गणपती किती दिवसांचा आहे?

– सजावट / देखाव्यासाठी काय केले आहे?

– किती वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करत आहात?

– इको फ्रेंडली गणोशोत्सव साजरा करावा असे का वाटले? किंवा त्यामागची प्रेरणा काय होती?

ज्या गणपतीला सर्वाधिक वोट, तो ठरणार विजेता!

– तुम्ही दिलेली माहिती आम्ही www.mymahanagar.com या वेबसाईटवर अपलोड करु

– त्यानंतर त्याची पोस्ट मायमहानगरच्या फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर शेअर केली जाईल.

– तुम्ही सोशल मीडियावर असाल तर तुम्हालाही त्यात टॅग केले जाईल.

– तुम्हालाही तुमची लिंक पाठवली जाईल. या लिंकवर तुमच्या गणपतीसाठी वोटिंगचा पर्याय असेल

– ज्यांच्या लिंकवर जास्तीत जास्त वोट मिळतील त्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकानुसार आकर्षक बक्षिसे दिली जातील!