घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धाइको फ्रेंडली गणेशोत्सवाचा आग्रह धरा - अभिषेक शेवाळे

इको फ्रेंडली गणेशोत्सवाचा आग्रह धरा – अभिषेक शेवाळे

Subscribe

कराड येथे राहणारे अभिषेक शेवाळे यांनी इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या पाच वर्षांपासून ते घरात गणपती बसवत आहेत. दहा दिवसांसाठी गणरायाची ते प्रतिष्ठापणा करतात. मुर्तीपासून ते सजावटीपर्यंत सर्व साहित्य इको फ्रेंडली विघटनशील असे आहे. सजावटीसाठी त्यांनी लालबागच्या राजाची प्रतिकृती उभारली आहे. तसा मुंबईकर नेहमीच लालबागचे दर्शन घेत असतात. मात्र गावाकडील लोकांना ते शक्य होत नाही. त्यामुळे शेवाळे यांनी घरच्याघरीच लालबागच्या राजाचा देखावा निर्माण केला आहे. जेणेकरुन गावातील लोकांनाही त्याचे दर्शन घेता येईल.
इको फ्रेंडली संकल्पनेबद्दल शेवाळे सांगतात की, जर मी याप्रकारे उत्सव साजरा केला तर इतर लोकही त्याचे अनुकरण करतील. ग्रामीण भागात खरंतर इतर सर्वच सण पर्यावरण पूरक पद्धतीने साजरे केले जातात, मग गणेशोत्सव का नाही? शेवाळे यांचा हा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत नेण्यासाठी तुम्ही त्यांना वोट करा. लिंक शेअर करा.


 

- Advertisement -

जाणून घ्या – इको फ्रेंडली बाप्पा काँटेस्ट बद्दल

माय महानगरच्या वेबसाईटवर यासाठी एक विशेष सेक्शन तयार करण्यात आला आहे. येथे तुम्ही स्वतःचे सेल्फी अपलोड करु शकता. बाप्पांसोबतचा सेल्फी, घरगुती गणपतीसोबत कौटुंबिक फोटो, आपल्या मंडळातील गणपतीचा फोटो, आगमन आणि मिरवणुकीतीलही फोटो तुम्ही अपलोड करु शकता.

तुमचे सेल्फी अपलोड करण्यासाठी क्लिक करा… 

तसेच लालबागच्या राजाचे थेट लाईव्ह दर्शनही घेता येणार आहे. लालबागच्या राजाचे मुखदर्शन ते विसर्जन असे सर्व दहा दिवस माय महानगर वेबसाईटवर लालबागच्या राजाला तुम्ही पाहू शकता. याशिवाय गणेशोत्सवासंबंधीची प्रत्येक अपडेट, सार्वजनिक मंडळाचे उपक्रम, इको फ्रेंडली गणपती आणि उत्सवाशी निगडीत सर्व बातम्या मिळतील एका क्लिकवर…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -