मिनल नेरकर यांचा विज्ञानवादी बाप्पा

Pune

पुण्याच्या मिनल नेरकर यांनी इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा केला आहे. नेरकर यांच्या घरी विराजमान झालेला बाप्पाची मूर्ती शाडूची आहे. याशिवाय त्यांनी केलेली सजावटही इको फ्रेंडली आहे. नेरकर यांचा ११ वर्षीय मुलाचे विज्ञानावर प्रेम आहे. त्यामुळे आपल्या बाप्पाचा देखावाही त्यांनी विज्ञानावर आधारीत असा केला आहे. इस्रोच्या चांद्रयान २ या ऐतिहासिक मोहीमेवर बाप्पांचा देखावा साकारलेला आहे. रोव्हर, लँडर आणि ऑर्बिटरबाबत लोकांना बेसिक माहिती देण्याचा प्रयत्न नेरकर कुटुंबियांनी केला आहे. विशेष म्हणजे या संपुर्ण देखाव्यासाठी फक्त २०० रुपये खर्च आल्याचे नेरकर यांनी सांगितले.

‘आम्ही गेल्या चार ते पाच वर्षांपासून इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करत आहोत. वसुंधरेचे मानवी जीवनातील महत्त्व आणि प्रदूषणामुळे होणारी तिची हानी आपल्या मुलाला समजवून सांगण्यासाठी इको फ्रेंडली गणशोत्सव उत्तम माध्यम असल्याचे मिनल नेरकर यांनी सांगितले.