श्रवण घोडके यांनी साकारला चिंध्यांपासून देखावा

Mumbai
contestant shravan ghodke
चिंध्यांपासून साकारला देखावा

श्रवण घोडके यांनी आपल्या बाप्पाकरता इको फ्रेंडली देखावा साकारला आहे. चिंचपोकळी येथे राहणाऱ्या घोडके कुटुंबियांनी यंदा चिंध्यांपासून देखावा साकारला असून विविध रंग एकरूप करून निसर्गात निवांत बसलेला बाप्पा अस या देखाव्यातून दाखवण्यात आले आहे. त्यांनी हा देखावा साकारण्याकरता टेलरकडून चिंध्या आणल्याचे घोडके यांनी सांगितले आहे.


दीड फूट उंचीची मूर्ती विशाल सूर्यकांत शिंदे या मूर्तीकारांने साकारली आहे. अनेकदा कापड वापरून झाल्यावर त्याचा भरपूर कमी प्रमाणात पुनर्वापर केला जातो. या कपड्यामुळे टेक्सटाईल प्रदूषण होते. त्यामुळे वापरलेल्या कापडाचा पुनर्वापर करा हा संदेश या सजावटीतून देण्यात आला आहे.