घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धाफिश टँकचे महत्त्व सांगणारा विजय गायकवाड यांचा बाप्पा

फिश टँकचे महत्त्व सांगणारा विजय गायकवाड यांचा बाप्पा

Subscribe

मुंबईत राहणारे विजय गायकवाड हे दरवर्षी आपल्या घरी इको फ्रेंडली पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतात. मागच्या वर्षी रस्ते अपघातात जीव गमावणाऱ्यांचे प्रबोधन करणारा देखाव त्यांनी साकारला होता. तर यावर्षी घरात फिश टँक ठेवल्यास काय सकारात्मक परिणाम घडू शकतात, याची माहिती देणारा देखावा त्यांनी साकारला आहे. तसेच विजय गायकवाड यांनी इको फ्रेंडली शाडूची मुर्ती घरी बसवली आहे. त्या मुर्तीसमोर “आई बाबा मी परत येतोय, पर्यावरणपूरक असल्याने सुखरुप येईल माझी विटंबना होणार नाही” असा संदेशही त्यांनी लिहिला आहे.

गायकवाड यांनी सजावटीला फिश टँकचा देखावा केला आहे. या देखाव्यासोबत एक ध्वनिफित प्ले होते. ज्यामध्ये फिश टँकचे महत्त्व विशद करण्यात आले आहे. “अनेक घरात फिश टँक पाहायला मिळतात. वास्तूशास्त्रानुसार मासा घरात असणे, हे शुभ मानले जातात. रंगबीरंगी मासे सकारात्मक उर्जा निर्माण करतात. मानसिक ताणतणाव जाणवत नाही. मन शांत, स्थिर राहते. अॅक्वेरियममधील माशाकडे एकटक पाहत राहिल्यामुळे रक्तदाब स्थिर राहतो. श्री गणेशाच्या दर्शनाने मांगल्य, सुश, शांती, समृद्धी येते. तसेच फिश टँकच्या घरी असण्याने सकारात्मक उर्जेचे सोनेरी चैतन्य घरात येते. प्रगतीकडे वाटचाल आणि मानसिक स्वास्थासाठी घरामध्ये एक फिश टँक ठेवा.” असा संदेश गायकवाड यांनी दिला आहे.

- Advertisement -

 


स्पर्धकाचे नाव – विजय गायकवाड

- Advertisement -

पत्ता – भायखळा, मुंबई

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -