हाताने तयार केलेल्या खोडके यांच्या बाप्पाची बातच न्यारी!

Mumbai

कल्याणमध्ये राहणाऱ्या परेश खोडके यांच्या घरी अगदी साधेपणाने आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होतो. त्यांनी यावर्षी स्वतः गणेश मूर्ती घरी बनवलेली आहे. गणेश मुर्ती पेपर चा लगदा व शाळु माती यांच्यापासून घरी बनवलेली आहे तसेच मूर्तीला साधे पाण्याचे रंग देण्यात आलेले आहे. तसेच डेकोरेशनमध्ये देखील कागद आणि पुठ्याचा वापर करण्यात आलेला आहे.


खोडके यांच्या घरची सजावट बाप्पालाही आवडेल अशीच आहे. कारण खोडके यांच्या लहान मुलांनी या बाप्पाला स्वत: रंगवले आहे. बाप्पा बैलगाडीतून निघाला असा देखावा त्यांनी तयार केला आहे. एखाद्या गावाचा हा देखावा आहे. कागदापासू तयार केलेले झाड,डोंगर या देखाव्याची शोभा वाढवत आहेत. या देखाव्यात हा बाप्पाही अगदी शोभून दिसत आहे. त्याचप्रमाणे या बाप्पाचेही विसर्जनही खोडके कुटूंबियांनी पुर्यावरण पूरक असेच बादलीत केले आहे.


 

स्पर्धकाचे नाव– परेश रमाकांत खोडके
पत्ता– बी 101 भागीरथी इस्टेट छोटा मसोबा मैदान, चिकन घर, कल्याण पश्चिम जिल्हा ठाणे