सोनवणे कुटुंबियांनी केला इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा

Mumbai

सोनवणे कुटुंबियांनी यंदा आपल्या घरी बाप्पाचे सजावट पर्यावरणपूरक पद्धतीने केली आहे. सोनवणे कुटुंबियांकडे १० दिवसांकरिता बाप्पा विराजमान करण्यात येतो. पर्यावरणाला कोणतीही हानी पोहचू नये म्हणून सोनवणे कुटुंब शाडूच्या मातीचा बाप्पा आपल्या घरी आणतात.

यावेळी आपल्या लाडक्या बाप्पांची आरास करण्यासाठी वारकरी संप्रदाय ही संकल्पना घेऊन गणपती बाप्पांचा देखावा साकारला आहे. वारकरी संप्रदायाची संकल्पना घेऊन त्य़ातील सुबक पालखी हे सजावटीमधील विशेष आकर्षण आहे.

यावेळीचा गणेश उत्सव साजरा करताना इकोफ्रेंडली गणेश उत्सव साजरा केलाच पाहिजे. यामुळे पर्यावरणाचे संरक्षण होऊन पुढील पिढीकरिता एकप्रकारचा संदेशच आहे, असे सोनवणे कुटुंबियांनी सांगितले.

नाव- श्रुती सुधाकर सोनवणे

पता- शिवम रो हाउस, वेणु नगर, आ. टी. आय अंबड लिंक रोड, नाशिक